‘Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..’,तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणा

Home » ‘Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..’,तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणा
‘Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..’,तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणा

Tanushree Dutta: तनुश्री दत्तानेपुन्हा एका नव्यानं दिलेल्या मुलाखतीत मी टू मोहिम सुरू केल्यानंतर आपल्या विष देऊन मारण्याचा प्रयत्न अनेकदा केला गेला, माझा उज्जैन इथं झालेला अपघात हा देखील घडवून आणलेला..कारण मी लोकांसमोर येऊन माझ्यासोबत घडलेला गैरप्रकार सांगितला… असा खळबळजनक आरोप केला आहे. तिन मागच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की,तिच्या घरी जी बाई नव्यानं कामाला लागली होती…ती खरंतर माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती असं म्हणाली होती. ती बाई घरी कामाला लागल्यानंतर अनेकदा आपण आजारीच पडायचो असं तनुश्री म्हणाली होती. तेव्हा तिला सारखी शंका यायची की आपल्याला पिण्याच्या पाण्यात काही मिसळून दिलं जातंय. (Tanushree Dutta claims multiple attempts were made to kill her post MeToo, again involved nana patekar name) हेही वाचा: एकाच वेळी दोघांना डेट करत होती अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या आईनेच केला मोठा खुलासाहे सगळं प्रकरण सुरु झालं तेव्हा, जेव्हा तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांनी ‘हॉर्न ओके प्लीज’ शूटिंगच्या सेटवर आपल्यासोबत गैरवर्तनं केलं याविरोधात सर्व जगासमोर आवाज उठवल्यानंतर. अर्थात तनुश्रीच्या या आरोपांना मान्य न करत नाना पाटेकरांनी त्यांना धुडकावून याआधीच लावलं आहे.या वर्षाच्या जुलै महिन्यात तनुश्रीनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की,”माझ्यासोबत जे काही आता चुकीचं घडत आहे,मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे याला कारणीभूत आहेत माझ्याशी गैरवर्तन करणारे नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया जे नाना पाटेकर यांच्याच मित्रपरिवारातून आहेत. कोण आहेत हे बॉलीवूड माफिया? हे तेच लोक आहेत ज्यांची नावं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सारखी समोर येत होती. जे लोक त्याच्याही आत्महत्येस कारणीभूत आहेत असं बोललं जात होतं”. Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत3 hours agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म3 hours agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज3 hours agoहेही वाचा: ‘धर्मवीर सिनेमाच्या काही आठवणीच माझ्याकडे नाहीत’, प्रवीण तरडे असं का म्हणाले?”त्यांचे सिनेमे पाहू नका,त्यांना बॉयकॉट करा. या वाईट विचारांनी बुरसटलेल्या इंडस्ट्रीला संपवून टाकायला हवं. मी अनुभवलंय याच बॉलीवूडच्या काही लोकांनी माझ्याविरोधात उगाचच काहीही चुकीच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांना आणि पी.आर ना आपल्या गाठीशी बांधलंय, माझ्याविरोधात मोहिम राबवायला सांगितलं आहे. अशा या बॉलीवूडकरांना सोडू नका तुम्ही”.हेही वाचा: मिलियन डॉलर स्माईलवाली रसिका…मी टू मोहिम सुरू केल्यानंतर तनुश्री भारतात २०२० साली परत आली. तिला खरंतर बॉलीवूडमध्ये परत यायचं होतं. तिनं तसे प्रयत्न करायलाही सुरुवात केलेली असं तिनं सोशल मीडियावर लिहिलं होतं. ती म्हणाली होती,”मी माझ्या करिअरला पुन्हा सुरू करायचा प्रयत्न करत होती,लोक माझ्यासोबत काम करण्यास तयारही होते,पण या बॉलीवूड माफियांनी माझ्यासाठी सगळं कठीण करून ठेवलं होतं…मला ऑफर येत होत्या,सिनेमाच्या-वेबसिरीजच्या,मी काही प्रोजेक्ट साइनही केले होते,पण नंतर हळूहळू सगळंच हातातून निसटू लागलं. लगेच मी साइन केलेल्या प्रोजेक्टचे निर्माते,दिग्दर्शक मागे हटले..कारणं देऊ लागले…फायनान्सरनी म्हणे मी त्या प्रोजेक्टमध्ये असल्यानं हात वर केले सांगू लागले”.हेही वाचा: कहर! लॉलीपॉप खात करिश्माने दिला नॉटी लूकती पुढे म्हणाली, ”मी २०२० साली भारतात आली तेव्हापासून माझ्यासोबत हे असं सतत घडत असल्याचा अनुभव घेतेय. लोकांना माझ्याविरोधात एक मेसेज करुन आदेश दिला जातोय,हिच्यासोबत काम करू नका. आणि मग लोक मला टाळतात,त्यांना माझ्यासोबत काम करायचं नाहीय असं सरळ तोंडावर सांगतात. ते बॉलीवूड माफिया माझ्यावर पाळत ठेवून आहेत,आणि त्यांना जसं हवंय तसं माझ्याविरोधात कट करतायत. ते ताकदवान आहेत आणि लोकांना त्यांच्याविरोधात पाऊल उचलून स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं नाहीय. कोणालाच मला संधी द्यायची नाहीय..”असं देखील तनुश्री आता दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.