‘ब्रह्मास्त्र’ साठी रणबीर कपूरने एक रुपयाही घेतला नाही, कारण ऐकून म्हणाल शाब्बास!

Home » ‘ब्रह्मास्त्र’ साठी रणबीर कपूरने एक रुपयाही घेतला नाही, कारण ऐकून म्हणाल शाब्बास!
‘ब्रह्मास्त्र’ साठी रणबीर कपूरने एक रुपयाही घेतला नाही, कारण ऐकून म्हणाल शाब्बास!

Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची चांगली पसंती मिळालीय. या सिनेमाने ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘केजीएफ-2’ चे काही रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. तसंच ‘ब्रह्मास्त्र’ हा 2022 या सालामध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. दोन आठवड्यांमध्ये या सिनेमाने 227.95 कोटींची कमाई करत ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. तर ॲडव्हान्स टिकीट बुकिंग मध्ये या सिनेमाने KGF-2 या सिनेमाला मागे टाकले आहे.(Ranbir Kapoor confirms he didn’t charge a fee for Brahmastra)हेही वाचा: हॉलीवूड अभिनेत्याचा आईच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याचा होता प्लॅन…आता बिग बजेट सिनेमा म्हटलं की कलाकारांची फी देखील तगडी असणार हे कुणीही सांगेल. मात्र या सिनेमातील रणबीर कपूरच्या फी बद्दल तुम्ही ऐकलं तर थक्क व्हाल. तुम्हाला वाटेल या सिनेमासाठी रणबीरने कित्येक कोटी घेतले असतील. मात्र जरा थांबा रणबीरने या सिनेमासाठी एकही रुपया घेतलेला नाही. होय ऐकून नवल वाटत असलं तरी हेच सत्य आहे. नुकताच या गोष्टीचा खुलासा झाला आहे. Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 58 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या59 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoहेही वाचा: ‘त्या संध्याकाळी असं काय घडलं की घटस्फोटाचा निर्णयच बदलला..’, चारु असोपा अखेर बोलली’ब्रह्मास्त्र’ या सिनेमासाठी अनेकांचं योगदान असून त्यांनी अनेक गोष्टींचा त्यागही केलाय असा खुलासा याआधीच सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने एका मुलाखतीमध्ये केला होता. या सिनेमाचं बजेट 410 कोटी रुपये होतं असं सांगण्यात आलं असलं तरी या सिनेमासाठी प्रत्यक्षात 600 कोटींहून अधिक खर्च झालाय. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या सिनेमासाठी रणबीर कपूरने एक रुपयाही घेतला नसल्याचं आता समोर आलंय. सिनेमा तीन भागात असल्याने मोठा खर्च झाला असल्याचं याआधी रणबीरने सांगितलं होतं. खास करून सिनेमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी देखील मोठा खर्च झाला आहे. हेही वाचा: ‘Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..’,तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणाएका मुलाखतीमध्ये आयान मुखर्जी म्हणाला होता, ” या सिनेमासाठी अनेकांनी खासगी पातळीवर मोठा त्याग केला आहे. हे खरं आहे की या सिनेमासाठी रणबीर कपूरने एक रुपयाही घेतला नाही. ब्रह्मास्त्रच्या निर्मितीसाठी त्याने कोणतंही मानधन घेतलेलं नाही. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळ्यांच्या या त्यागाशिवाय हा सिनेमा बनवणं अशक्य होतं.” सिनेमाच्या व्हीएफएक्स वर मोठा खर्च झाल्याचा तो म्हणाला. सिनेमा लवकर तयार व्हावा यासाठी अनेक खर्च टाळण्यात आले होते. असं असलं तरी सिनेमा तयार होण्यासाठी दहा वर्षे लागली. हेही वाचा: KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली ‘ही’ स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूलीम्हणून रणबीर कपूरने मानधन घेतलं नाहीयाच मुलाखतीत रणबीरने देखील त्याने सिनेमासाठी कोणतेही मानधन न घेतल्याच स्पष्ट केलं . तो म्हणाला “ही माझी आयुष्यभराची पुंजी आहे. मी देखील या सिनेमाचा पार्ट प्रोड्युसर आहे. मी दूरचा विचार करतो. मला विश्वास आहे सिनेमाच्या तीन भागातून मोठी कमाई होणार आहे. शिवाय या सिनेमाचे तीन भाग बनणार आहेत. अभिनेता म्हणून हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई आहे.”हेही वाचा: Video: ‘नवा गडी,नवं राज्य’च्या सेटवर कोण आहे सायशाची फनी ताई? आनंदी की रमा?2014 साली आलिया भट्ट ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या टीम मध्ये सहभागी झाली. त्यावेळी ती बॉलीवूडमध्ये नवखी होती. त्यामुळे आलियाची देखील फी अत्यंत कमी ठरवण्यात आली होती असं अयानने सांगितलं. शिवाय सिनेमा तयार होईपर्यंत ही फी देखील निर्मितीसाठीच खर्च झाली असं तो म्हणाला.