जगातील आठ अब्जाधीशांना ४१ अब्ज डॉलरचा फटका

Home » जगातील आठ अब्जाधीशांना ४१ अब्ज डॉलरचा फटका
जगातील आठ अब्जाधीशांना ४१ अब्ज डॉलरचा फटका

नवी दिल्ली : महागाई आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे व्याजदरवाढीचे धोरण यामुळे आज अमेरिकी शेअर बाजार कोसळले. शेअर बाजारातील या सुनामीमुळे जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांपैकी आठ अब्जाधीशांना तब्बल ४१ अब्ज डॉलरचा फटका बसला. यामध्ये अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस यांचे ९.८४ अब्ज डॉलरचे, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे ८.३५ अब्ज डॉलरचे तर बिल गेट्स यांचे २.८४ अब्जचे नुकसान झाले आहे.अमेरिकी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स आज १२७६अंशांपेक्षा जास्त घसरणीसह ३१,१०४च्या पातळीवर बंद झाला. या भीतीमुळे टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगल, अॅमेझॉनसारखे दिग्गज शेअर कोसळले. या बड्या कंपन्यांशी संबंधित अब्जाधीशांच्या संपत्तीवरही त्याचा परिणाम झाला. ब्लूमबर्ग बिलियनेअर यादीतील पहिल्या दहा अब्जाधीशांपैकी अनुक्रमे तिसऱ्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर अंबानींच्या संपत्तीत १.२३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 2 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.26 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी47 minutes ago