Health : ग्रीन टीमध्ये ‘या’ दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा

Home » Health : ग्रीन टीमध्ये ‘या’ दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा
Health : ग्रीन टीमध्ये ‘या’ दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा

ग्रीन टीच चे फायदे तुम्ही माहिती असतील. ग्रीन टी पिल्याने बरेच फायदे होतात त्यामुळे दिवसातून एकवेळ तरी ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी आपण वाचले किंवा ऐकले असेल. आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे पॉलिफेनॉल यामध्ये आढळते. नैसर्गिक संयुगे आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी यां ची मदत होते. कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही ग्रीन टी उपयोगी आहे. यामध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करतात. ग्रीन टीचे फायदे जाणून अनेकांनी आपल्या जीवनशैलीत या चहाचा समावेश करुन घेतला आहे. मात्र, ते बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. त्यातील कॅटकिन्स आणि कॅफिन चयापचय वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे हा या ग्रीन टीला आणखी आरोग्यदायी कसा बनवता येईल यासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत..Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.41 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या47 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ59 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoहेही वाचा: Food : रेस्टॉरंट स्टाईलचे कुरकुरीत पालक पत्ता चाट, घरीच बनवा सोपी रेसिपीचहा नाही, हेल्थ ड्रिंक समजून प्या..देशी चहाप्रेमींना ग्रीन टीची चव क्वचितच आवडते. कारण ती चव पूर्णत: वेगळी आहे. ग्रीन टीचे आरोग्यासाठी फायदे लक्षात घेता दैनंदिन जीवनात त्याचा समावेश करणे उत्तम ठरू शकते. चहाप्रेमींनी याकडे चहाचा पर्याय म्हणून न पाहता हेल्थ ड्रिंक म्हणून पहावे. जर तुम्हाला फक्त हिरवे पाणी पित आहोत असे वाटत असेल तर तुम्ही इतरही काही गोष्टी या चहात टाकू शकता. ज्यामुळे त्याचे फायदे वाढतील. आले आणि दालचिनी या दोन गोष्टी तुम्ही या चहामध्ये टाकून पिलात तर आरोग्यासाठी फायद्याचे राहिल.ग्रीन टी कसा बनवाल?एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात दालचिनी पावडर आणि आलं टाका. या पाण्यात दोन्ही गोष्टींचा अर्क येईपर्यंत ते उकळवा. आता एका कपमध्ये ग्रीन टीची पाने टाका. पाणी त्या उकळलेल्या पाण्यात वरून टाका. पाण्याचा रंग बदलेपर्यंत 5 मिनिटे तसेच राहू द्या. आता हा चहा गाळून प्या. त्यात गोडवा आणायचा असेल तर मधही टाकू शकता.हेही वाचा: Health Tips: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का? ताबडतोब करा हे उपायकाय आहेत फायदे?दालचिनी आणि आले या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. दालचिनीमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याचा मधुमेहविरोधी प्रभावही आहे. इतकेच नाही तर अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये हे फायदेशीर मानले जाते. काही अभ्यासांतून त्याचे कर्करोगविरोधी गुणधर्म दिसून आले आहेत. हे परिणाम चाचणी ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासावर आधारित आहेत.