Mumbai News : डेंगी, मलेरियाचा ‘ताप’ वाढला

Home » Mumbai News : डेंगी, मलेरियाचा ‘ताप’ वाढला
Mumbai News : डेंगी, मलेरियाचा ‘ताप’ वाढला

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अजून तो पूर्णतः संपुष्टात आलेला नाही. त्यापाठोपाठ स्वाईन फ्‍ल्यूनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलेली असताना दुसरीकडे डेंगीने देखील हात-पाय पसरविण्यास सुरुवात केल्याने जिल्‍ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जुलैपेक्षा ऑगस्ट महिन्यात डेंगीच्‍या ५४ रुग्णांची वाढ झाली असून, एकट्या ऑगस्ट महिन्यात रुग्णांची संख्या १९१ वर पोहोचली आहे. दरम्‍यान, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे.बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारामध्ये वाढ होत असल्याचे चित्र शहर परिसरात आहे. सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. अनेक भागांतील दवाखान्‍यांमध्ये अशा आजारांच्या रुग्णांची रांग लागत असल्याचे दिसून येते. दिवसाला १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती एका वैद्यकीय तज्‍ज्ञांकडून देण्‍यात आली.
साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष पावसाळ्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून राहते. त्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर दलदलीच्‍या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे या कालावधीत डेंगी, मलेरियाची साथ पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक जण साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याचे रूपांतर हे डेंगी आणि मलेरियामध्ये होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग ओसरल्यामुळे आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; परंतु कोरोनापाठोपाठ सध्या स्वाईन फ्‍ल्‍यू, डेंगी आणि मलेरिया या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण पुन्हा वाढला आहे. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर17 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त18 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.18 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम24 minutes agoठाणे, बदलापूर रडारवर
जिल्ह्यात जुलै महिन्यात डेंगीचे १३७ तर मलेरियाचे २९५ रुग्ण आढळले होते. मात्र, ॲागस्ट महिन्यात या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात ॲागस्ट महिन्यात डेंगीचे १९१ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ७४ रुग्ण हे बदलापूर शहरातील आहेत. एकीकडे डेंगीच्या रुग्णांची संख्या जिल्‍ह्यात वाढत असली तरी मलेरियाच्या रुग्णसंख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ॲागस्ट महिन्यात मलेरियाचे १६७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मागील दोन महिन्यांचा अहवाल
जुलै – ॲागस्ट
शहर डेंगी -मलेरिया डेंगी मलेरिया
ठाणे २५-१९६ २५-७५
कल्याण-डोंबिवली २४-२७ २५-३०
उल्हासनगर ०३-०४ ०२-०२
नवी मुंबई ०४-१६ ०१-३६
भिवंडी १२-०७ ०४-०३
मिरा भाईंदर ०२-१८ ०१ -०७
अंबरनाथ ०६-०७ २१-०४
बदलापूर १२-०६ ७४-०२
ठाणे ग्रामीण ४९-१४ ३८-०८
एकूण १३७-२९५ १९१-१६७