तरुण दिसण्यासाठी तब्बूनं खरेदी केलं ५० हजाराचं क्रीम, पुढे जे घडलं ते तिच्याकडनंच ऐका

Home » तरुण दिसण्यासाठी तब्बूनं खरेदी केलं ५० हजाराचं क्रीम, पुढे जे घडलं ते तिच्याकडनंच ऐका
तरुण दिसण्यासाठी तब्बूनं खरेदी केलं ५० हजाराचं क्रीम, पुढे जे घडलं ते तिच्याकडनंच ऐका

Tabbu: तब्बू नेहमीच तिच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिली. आज वयाची पन्नाशी गाठलेली तब्बू आपल्या प्रत्येक सिनेमागणिक अधिक प्रतिभावंत अभिनेत्री बनत चालली आहे. गेल्या तीन दशकांपासून तब्बू आपल्या टॅलेंटसोबतच आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. तिच्या सौंदर्यात एक वेगळीच मादकता आहे. एका मुलाखतीत तब्बूनं वय वाढतंय पण आपण अधिक का तरुण दिसत चाललो आहोत याचं रहस्य सांगितलं आहे.(Tabbu Bought a face cream of rupees 50,000 but will never make that mistake again, why?)हेही वाचा: सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,’हा मुलगा पुढे..’ तब्बू म्हणाली की,”माझं असं काही खास रूटीन नाहीय, ज्याला मी अगदी काटेकोरपणे पाळते. मी ज्या क्षेत्रात काम करते त्याच्या गरजा मला माहीत आहेत आणि म्हणूनच मी सौंदर्य आणि फिटनेस कसं चांगलं राहिल यासाठी पूर्ण प्रयत्न करते”. वाढत्या वयातही इतकं तरुण ती कशी दिसते यावर जेव्हा तिला विचारलं गेलं तेव्हा ती हसत-हसत म्हणाली,”काही सीक्रेट वगैरे नाही यात. पण एक किस्सा इथे आवर्जुन सांगेन म्हणजे तुम्हाला थोडी कल्पना येईल. एकदा माझी मेकअप आर्टिस्ट मला म्हणाली,’मॅम तुमची स्कीन खूप चांगली वाटतेय,काही खास करता का स्कीनसाठी?’. ”कधीतरी जर मी तिला सांगेन की मी चेहऱ्याला कॉफी लावते आणि त्यासाठी कॉफीचं झाडही घरी लावलंय मी, तर ती मला पटकन बोलेल,तुम्ही तसं नका करु मॅम. यापेक्षा तुम्हाला हे क्रीम वापरायला हवं. मग ती कोणतंतरी ५० हजाराचं वगैरे क्रीम मला सांगेल. एकदा तिच्या सांगण्यावरनं विकत घेतलेलं तेवढं पूरे झालं. आता यापुढे कानाला खडा लावलाय,कधीच असं महागडं खरेदी करुन पैसे वाया घालवणार नाही”.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर41 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त42 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.42 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम48 minutes agoहेही वाचा: KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली ‘ही’ स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूलीतेव्हा लगेच मुलाखतीत जेव्हा तिला विचारलं की तुझ्या सौंदर्याचं रहस्य तुझं आनंदी राहणं आहे का? तेव्हा तब्बू लगेच उत्तरली,”यात मोठा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे…डीनए शेवटी महत्त्वाचा. मी असं काही खास करत नाही माझ्या चेहऱ्यासाठी. फक्त मला माहीत आहे की मला चांगलं दिसायचं आहे. तेव्हा प्रयत्न करते ते बिघडू नये. पण हे तर सगळेच करतात. त्यासाठी मग अभिनेत्रीच असायला हवं असं नाही. सगळ्यांनाच सुंदर दिसावसं वाटतं,हेल्दी रहावं असं वाटतं. तसंच सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य नीट रहावं असं देखील वाटतं. मी सुद्धा तसाच प्रयत्न करते”.हेही वाचा: Video: ‘नवा गडी,नवं राज्य’च्या सेटवर कोण आहे सायशाची फनी ताई? आनंदी की रमा?तब्बूला आपण शेवटचं ‘भूलभूलैय्या २’ मध्ये पाहिलं होतं. या सिनेमात तिचा डबल रोल होता. आता लवकरच ती विशाल भारद्वाजच्या सिनेमात दिसणार आहे. विशाल भारद्वाज ‘खुफिया’ नावाचा सिनेमा बनवतोय. जो नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. यामध्ये तब्बूसोबत अली फजल काम करत आहे.