वडिलांना निरोप देऊन राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने लिहिली पोस्ट..

Home » वडिलांना निरोप देऊन राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने लिहिली पोस्ट..
वडिलांना निरोप देऊन राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने लिहिली पोस्ट..

सस्टँडअप कॉमेडियन अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनतर आज गुरुवार २२ सप्टेंबर रोजी दिल्ली मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजु यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीहि चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी राजू श्रीवास्तव अमर रहे.. चा नारा दिला. हीच परिस्थिती सोशल मीडियावर आहे. देशभरातील नागरिक राजू यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आता राजू यांच्या मुलीनेहि सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (Raju Srivastava’s daughter Antara’s emotional send-off to father, also thanks fans for condolences)सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली दिली जात आहे. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर श्रीवास्तव कुटुंबियांना मिळणाऱ्या प्रेमाविषयी आभार मानले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. राजू श्रीवास्तव यांचे मित्र, चाहते सगळेचजण त्यांच्या कुटुंबाला आधार देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजन त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचं सांगत आहेत. या मिळणाऱ्या प्रेमाबद्दल राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने सगळ्यांचे आभार मानले आहेत.Recommended Articlesसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.3 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.3 hours agoराजू श्रीवास्तव यांनी काल 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेली 42 दिवस ते दिल्लीतील एम्स रुग्णालायत उपचार घेत होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना जीम मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार करूनही त्याला यश आले नाही. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्व शोकाकुल झाले असून प्रत्येकजन त्यांच्याविषयी लिहिते झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.