National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ

Home » National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ
National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ

सुरत : महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ठसा उमटवला. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांमध्ये पदक जिंकण्यात महाराष्ट्राला यश लाभले. महाराष्ट्राच्या महिलांनी रौप्यपदक, तर पुरुषांनी ब्राँझपदक पटकावले. महाराष्ट्राच्या महिलांचा अंतिम फेरीत पश्चिम बंगालविरुद्ध १-३ असा पराभव झाला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच हार सहन करावी लागल्यामुळे त्यांना ब्रॉंझपदक मिळाले.महिलांच्या अंतिम लढतीत पश्चिम बंगालच्या ऐहिका मुखर्जी हिने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिचा ११-३,११-५,११-३ असा पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या रीथ रिशा हिने सुतीर्था मुखर्जी हिला ११-९,१३-११,११-९ असे पराभूत करीत लढतीत १-१ अशी बरोबरी केली. दिया चितळे या महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ अशा चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११, १३-११, ८-११, १२-१०, ६-११ असा पराभव स्वीकारावा लागला. अखेर बंगालने ३-१ अशा फरकाने लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.Recommended ArticlesNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 3 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu3 hours agoकडवी झुंज अपयशीपुरुषांच्या उपांत्य फेरीत दिल्लीने महाराष्ट्राला ३-२ असे हरवले. महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला सुधांशू ग्रोवर याने ११-८, ९-११, ११-७, ११-७ असे नमविले. सनील शेट्टी याला पायस जैन याच्याविरुद्धचा सामना ११-६, ८-११, १२-१०, ५-११, ७-११ असा गमवावा लागला. महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे याने यशांश मलिक याचा ४-११, ११-९, ११-९, ११-९ असा पराभव केला.