Roblox, PUBG सारख्या 28 गेम्समध्ये मालवेअर; साडेतीन लाख युजर्सचा आर्थिक डेटा हॅक

Home » Roblox, PUBG सारख्या 28 गेम्समध्ये मालवेअर; साडेतीन लाख युजर्सचा आर्थिक डेटा हॅक
Roblox, PUBG सारख्या 28 गेम्समध्ये मालवेअर; साडेतीन लाख  युजर्सचा आर्थिक डेटा हॅक

नवी दिल्ली – ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या २८ गेम्सच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक माहिती अर्थात डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉब्लॉक्स, FIFA, PUBG आणि Minecraft सारख्या लोकप्रिय गेम्सचा या 28 गेम्समध्ये समावेश आहे. या गेम्सच्या माध्यमातून मालवेअरद्वारे आर्थिक डेटा हॅक करण्यात आला आहे. जुन-जुलै 2021 काळात सुमारे 92 हजार फाईल्सद्वारे 3 लाख 84 हजार युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे. (malware in 28 games news in Marathi)हेही वाचा: राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा म्हणजे केवळ मनोरंजन; नारायण राणेंचा हल्लाबोल
कॅस्परस्की संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षात रिलीज झालेल्या एल्डन रिंग, हॅलो आणि रेसिडेंट एव्हिलचा देखील आक्रमणकर्त्यांनी सक्रियपणे गैरवापर केला आहे. या गेम्सच्या माध्यमाथून ‘रेडलाइन’ मालवेअर पसरवण्यात आले आहे. रेडलाइन हे पासवर्ड चोरणारे सॉफ्टवेअर आहे, जे व्यक्तीच्या डिव्हाइसमधून पासवर्ड, सेव्ह केलेले बँक कार्ड तपशील, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि VPN सेवांसाठी क्रेडेन्शियल्स यांसारखा संवेदनशील डेटाची चोरी करते. “सायबर गुन्हेगार गेम खेळणाऱ्या युजर्सवर हल्ला करण्यासाठी, त्यांचा क्रेडिट कार्ड डेटा आणि अगदी गेम खाती चोरण्यासाठी अधिकाधिक नवीन युक्त्या आणि साधने तयार करत आहेत, ज्यात महागड्या स्किन असू शकतात. ज्या नंतर विकल्या जातात. उदाहरणासाठी जगभरात प्रचंड प्रसिद्ध मिळवत असलेल्या ई-स्पोर्टसवर स्टाईक देखील टाकू शकतात, असं कॅस्परस्की येथील वरिष्ठ सुरक्षा संशोधक अँटोन व्ही. इव्हानोव्ह यांनी सांगितलं. डाउनलोड करताना अनावश्यक प्रोग्राम्स आणि अॅडवेअरमध्ये संशोधकांना ट्रोजन स्पायस देखील आढळले आहे. जेकी कीबोर्डवर टाईप केलेला कोणताही डेटा ट्रॅक करण्यास आणि स्क्रीनशॉट घेण्यास सक्षम असे मालवेअर आहे. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoहेही वाचा: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ‘हा’ युवा नेता असणार ‘आप’चा चेहरा”CS:GO, PUBG आणि Warface” साठी इन-गेम स्टोअर्सच्या संपूर्ण इंटरफेसची नक्कल करून, स्कॅमर फसवी पृष्ठे तयार करतात, संभाव्य युजर्सला गेममध्ये विविध शस्त्रे आणि स्कील विनामूल्य प्रदान करतात. शिवाय भेटवस्तूचे आमीष दाखवून खेळाडूंना त्यांच्या Facebook किंवा Twitter सारख्या सोशल नेटवर्कींग साईटसचा लॉगीन डेटा प्रविष्ट करण्यास भाग पाडतात. दरम्यान सोशल अकाउंट ताब्यात घेतल्यानंतर, हल्लेखोर कार्ड तपशीलांसाठी वैयक्तिक संदेश पाठवतात किंवा युजर्सच्या विविध मित्रांकडे पैशाची मागणी करून फसवणूक करतात, असं संशोधकांनी सांगितले. 2021 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत डेटा हॅक करण्याचे प्रमाण 13 टक्क्यांनी वाढले आहे.