नवरात्रीच्या तोंडावर गाजतंय ‘दार उघड बये’चं शीर्षकगीत! गायिका म्हणते..

Home » नवरात्रीच्या तोंडावर गाजतंय ‘दार उघड बये’चं शीर्षकगीत! गायिका म्हणते..
नवरात्रीच्या तोंडावर गाजतंय ‘दार उघड बये’चं शीर्षकगीत! गायिका म्हणते..

zee marathi : मालिका सुरु होऊन दोनच दिवस झालेत पण मालिकेच्या शीर्षकगीताला आणि कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. ‘दार उघड बये’ या मालिकेमध्ये नाशिकच्या अनुजा देवरे हिने ‘वरी कोरड आभाळ’ हे गाणे गायलं आहे, या मालिकेचे शीर्षकगीत हे हृदय पिळवटून टाकणारे आहे, हे गाणे सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (daar ughad baye marathi serial title song get popular zee marathi ) अनुजा देवरे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेचे शीर्षकगीत गाऊन मराठी संगीत क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. अनुजा बद्दल सांगायचं झालं तर ती शिक्षण आणि गायन असा दुहेरी प्रवास करत आहे. अनुजा म्हणाली कि तिच्या आईचा आणि आजीचा आवाज सुंदर आहे, तिथूनच तिला सर्व प्रेरणा मिळाली. रचना विद्यालयात शिकत असताना तिने इयत्ता दहावी पासून गाण्याच्या मंचावर भाग घेतला. उत्तम गाण्याबद्दल तिच्या शिक्षकांच्या कौतुकाने प्रेरित होऊन अनुजाने आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश मिळवले. झी मराठीच्या मालिकेमध्ये गाण्याची तिची ही पहिलीच संधी आहे. Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 58 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या59 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours ago View this post on Instagram A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) सध्या नवरात्रीतचं वातावरण आहे. लवकरच घराघरात घटस्थापना होणार आहे. त्यामुळे देवीची गाणी, तिचा महिमा ऐकण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. अशातच झी मराठीच्या ‘दार उघड बये’ या मालिकेचे भाव भक्तीने भरलेले शीर्षक गीत चांगलेच गाजत आहे. या गाण्याविषयी गायिका अनुजा म्हणते, ‘शीर्षक गीताचे संगीतकार विजय कापसे आणि माझी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेट झाली. आम्ही दोघांनी तिथे परफॉर्म केले होते. एके दिवशी त्याने मला एक प्रोजेक्टआहे असे सांगून फोन केला आणि त्याने एक गाणं रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले. नंतर, मी रेकॉर्ड करून पाठवलेला गाणं हर्ष-विजय या दोन्ही संगीतकारांना आवडले आणि मला ही संधी मिळाली. हर्ष- विजय यांनी मला गाण्यातला भाव समजावून सांगितला. गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि पाय थिरकायला लावणारे शीर्षकगीत रेकॉर्ड झाले.’