बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Home » बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Share Market: सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. 21 सप्टेंबर रोजी होणार्‍या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीपूर्वी आणि इतर आशियाई आणि युरोपीय बाजारांची कमकुवत कामगिरी असूनही, भारतीय बाजार सकारात्मक दिसून आला. सोमवारच्या चांगल्या क्लोझिंगमुळे भारतीय शेअर बाजारातील तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स 300 अंकांनी अर्थात 0.51 टक्क्यांनी वाढून 59,141 वर पोहोचला. तर निफ्टी 91 अंकांनी अर्थात 0.52 टक्क्यांनी वाढून 17,622 वर बंद झाला.

भारत TINA चा (there is no alternative – कोणताही पर्याय नाही) आनंद घेत आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी खरेदीमध्ये काही रस दाखवला. शुक्रवारी FII ने भारतीय शेअर्समधून 1,200 कोटी रुपये काढल्यानंतर बाजार सुमारे 2 टक्क्यांनी घसरला होता.हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात सुरवातीला तेजी पण, बाजार अस्थिर राहण्याचे संकेतमेटल आणि रियल्टी वगळता निफ्टीच्या सर्व सेक्टरल इंडेक्सने कमबॅक केले. या दोन्ही इंडेक्समध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. ते अनुक्रमे 0.95 आणि 0.45 टक्क्यांनी घसरले. पीएसयू बँक इंडेक्स सर्वात मोठ्या वाढीसह दोन टक्क्यांहून अधिक वाढला. एफएमसीजी आणि ऑटो इंडेक्स प्रत्येकी एक टक्का वाढले. एम अँड एम, बजाज फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अदानी पोर्ट्स आणि एचयूएल हे निफ्टीमध्ये 2-3 टक्क्यांच्या दरम्यान वाढले. टाटा स्टील, टाटा मोटर्स, ब्रिटानिया, आयसीआयसीआय बँक आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. त्यात प्रत्येकी 2 ते 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.
Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoहेही वाचा: Stock: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेटआज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिकदृष्ट्या घसरणीनंतर निफ्टीला 17450 जवळ सपोर्ट मिळाला. यानंतर निफ्टी 17580-17665 च्या दरम्यान व्यवहार करताना दिसल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निफ्टी 17550 च्या वर ट्रेड करत असेल तर पुल-बॅक फॉर्मेशन चालू राहण्याची शक्यता आहे. यावर निर्देशांक 17675 च्या 20 दिवसांच्या SMA पातळीला स्पर्श करू शकतो. निफ्टी वर गेल्यास 17800 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17550 च्या खाली गेल्यास, निफ्टी पुन्हा 17450- 17400 च्या पातळीवर सरकू शकतो.

निफ्टीच्या सावध ट्रेंडमध्ये बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे मेहता इक्विटीज प्रशांत तापसे म्हणाले.  तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीला सर्वात मोठा सपोर्ट  17429 वर असेल. याच्या खाली निफ्टी 17161 च्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीला 17867 वर रझिस्टंस आहे. जर ही पातळी ओलांडली तर त्याला 18115 स्तरावर रझिस्टंस आहे.हेही वाचा: Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
ऍस्ट्रल (ASTRAL)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.