मस्कतहून कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग

Home » मस्कतहून कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग
मस्कतहून कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग

ओमानची राजधानी मस्कत येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून अचानक धूर निघू लागल्याचा प्रकार समोर आला. बुधवारी कोचीनला जाणार्‍या एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 442 च्या इंजिन क्रमांक 2 मध्ये आग लागून धूर निघू लागल्याने 140 हून अधिक प्रवाशांना बाहेर काढावे लागले. ओमानमधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात सुमारे 14 लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या विमानातून धूर निघू लागल्याने स्लाइडवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान बुधवारी सकाळी कोचीला रवाना होणार होते पण त्यापूर्वीच हा अपघात झाला.एका अधिकाऱ्याने सांगितले, VT AXZ म्हणून रजिस्टर्ड विमान B737-800, मस्कतमध्ये उड्डाणासाठी तयार होते, मात्र त्यामधून धूर आणि इंजिन क्रमांक 2 ला आग लागल्याचे आढळून आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवासी (141+4 लहान मुलांना) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना टर्मिनल इमारतीत नेण्यात आले आणि त्यांना परत घेऊन जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.Recommended Articlesपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.25 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी46 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 46 minutes agoहेही वाचा: iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमतीएअर इंडिया एक्स्प्रेसचे मस्कत-कोची विमान उड्डाणाच्या वेळी धावपट्टीवर असताना त्यात धूर निघताना आढळून आले. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना स्लाइडच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. विमानात 141 प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. सर्वांना बाहेर काढण्यात आले व ते सर्व सुरक्षित आहेत.नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात, प्रवाशांसाठी दुसरे विमान उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती दिली. डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA)चे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की या प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू असे सांगितले. विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इंजिनला आग लागल्याची माहिती दिली, त्यानंतर सर्व आवश्यक कारवाई करण्यात आली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी टॅक्सीवेवर स्लाइड्स तैनात करण्यात आल्या होत्याविशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी कालिकतहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान जळण्याच्या वासाने मस्कतला वळवावे लागले होते. मात्र, नंतर कोणतीही गंभीर प्रकार समोर आला नव्हता.हेही वाचा: गुजरातच्या ढोलेरापेक्षा तळेगाव हे ठिकाण योग्य? अहवालाचा फोटो होतोय व्हायरल