हॉलीवूड अभिनेत्याचा आईच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याचा होता प्लॅन…

Home » हॉलीवूड अभिनेत्याचा आईच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याचा होता प्लॅन…
हॉलीवूड अभिनेत्याचा आईच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याचा होता प्लॅन…

Hollywood Actor Ryan Grantham:आजच्या काळात काय घडेल आणि काय नाही हे सांगता यायचं नाही. घरातही आपल्यांच्या जीवावर उठणारे आज कमी नाहीत. जन्मदात्या आईला जिथं मारलं जातं तिथं आणखी काय अपेक्षा करायची. हॉलीवूड अभिनेत्यानं असंच एक भयानक कृत्य केलं आहे. रिवरडेल आणि डायरी ऑफ ए विम्पी किड सिनेमांचा अभिनेता रायन ग्रांथम,ज्याचं वय अवघं २४ वर्षांचे आहे. अभिनेत्यानं मार्च,२०२० मध्ये आपल्याच आईची हत्या केली आणि आता त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, कोर्टाने २० सप्टेंबर रोजी ग्रांथमला आईच्या हत्ये प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.(Riverdale Actor Ryan Grantham To Serve Life Sentence For Murdering Mother)हेही वाचा: Video: ‘नवा गडी,नवं राज्य’च्या सेटवर कोण आहे सायशाची फनी ताई? आनंदी की रमा?सीबीएस न्यूजच्या माहितीनुसार कळत आहे की, रायन ने पियानो वाजवताना आपली आई बार्बरा वाइच्या डोक्यावर बंदूकीतनं गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली. या प्रकरणात त्याला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटीश कोलंबियाच्या सुप्रिम कोर्टानं व्हॅंकूव्हर मध्ये यावर निर्णय दिला. ग्रांथमला रिवरडेल मधील त्याच्या भूमिकेमुळे ओळखले जाते. त्यानं सुपर नॅचरल आणि iZombie,फॉलिंग स्काईज सिनेमातून देखील काम केले आहे.जेव्हा ग्रांथमला आईच्या हत्येप्रकरणात शिक्षा झाली तेव्हा असं देखील समोर आलं होतं की ग्रांथमचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांची हत्या करण्याचा देखील प्लॅन होता. असं त्यावेळी कॉम्प्लेक्स कॅनडानं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. ग्रांथमचा कॅनडाचे पंतप्रधान टूडो यांना मारण्याचा प्लॅन होता,जे पोलिसांना दिलेल्या साक्षीमधून समोर आलं होतं. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर40 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त41 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.41 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम47 minutes agoहेही वाचा: सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,’हा मुलगा पुढे..’सुरुवातीला फर्स्ट डिग्री मर्डरचा आरोप त्याच्यावर लागल्यानंतर,ग्रांथमने या वर्षाच्या सुरुवातीला सेकन्ड डिग्री मर्डरची देखील कबूली दिली. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये काही व्हिडीओज देखील होते. ज्यांना ग्रांथमच्या पूर्ण चौकशी दरम्यान शूट करण्यात आलं होतं. यामधील एका व्हिडीओत त्यानं आपल्या आईच्या हत्येची कबूली दिली आहे. हे देखील त्यानं सांगितलं की एक सामूहिक हत्या करण्याचा देखील विचार होता,ज्यात साइमन फ्रेजर युनिव्हर्सिटीमधील त्याचा एक मित्र देखील सामिल होता. ग्रांथमची बहिण लिसा ग्रांथमने देखील कोर्टात साक्ष दिली की तिचा भाऊ खूप खतरनाक माणूस आहे. तो काहीही करू शकतो.