Fake Loan App : बनावट लोन अॅप कसं ओळखाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Home » Fake Loan App : बनावट लोन अॅप कसं ओळखाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Fake Loan App : बनावट लोन अॅप कसं ओळखाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजच्या काळात बँका (Banks), फायनान्शिअल कंपन्या याव्यतिरिक्त काही अॅप्स असेही आहेत, जे अवघ्या काही मिनिटांत कर्ज देतात. गरजेपोटी कर्ज घेण्यास काही हरकत नाही. मात्र, तुम्ही कर्ज घेताय कुठून हे ही खूप गरजेचं असतं. आजकाल लोन अॅपच्या (Loan App) नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी कशी बाळगावी हे जाणून घ्यायला हवं. कारण, आजकाल झटपट कर्ज देणारे अनेक अॅप्स आहेत. हे अॅप्स कोणतीही KYC न करता किंवा पुरेसे कागदपत्र पडताळणीशिवाय कर्ज देतात. याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, हे अॅप्स ग्राहकांना कर्ज देऊन अडकवतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायला लागतात. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoहेही वाचा: Vedanta-Foxconn Project : ..तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला नसता; ‘मविआ’वर टीका सामंतांनी सांगितलं कारणबनावट लोन अॅपडिजिटल कर्ज देणारे हे अॅप्स केंद्रीय बँकेकडे नोंदणीकृत नसतात. कंपन्याद्वारे हे अॅप्स चालवले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल लोन अॅप्सच्या (Digital Loan Apps) ऑपरेटरकडून छळवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आरबीआय नोंदणीकृत अॅप्सची यादी तयार करणार आहे. हे लोन अॅप कशाप्रकारे आपलं सावज हेरतात? तर या कंपन्या बऱ्याचदा आपल्याला एखाद्या ऑनलाइन वेबसाईटवर दिसतात. या लिंकवर क्लिक केल्यास अमुक रकमेचे कर्ज मिळेल असे दावे केले जातात. लोकांना भुरळ पाडण्यासाठी लिंक पाठवून त्यावर क्लिक केल्यास कर्ज मिळेल, असं सांगितलं जातं. तसेच, कोणतीही सुरक्षा किंवा कागदपत्रे आवश्यक नसल्याचं सांगितलं जातं. बहुतेक लोक लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर खऱ्या अडचणी सुरू होतात.फसवणूक करणारे लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. इथं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, कोणतीही बँक कधीही लिंकवर क्लिक करून किंवा कोणतेही अॅप डाउनलोड करून कर्ज देत नाही. लिंकवर क्लिक केल्याने तुमच्या फोनमधील वैयक्तिक माहिती शेअर होते. कर्जाशी संबंधित असे अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर आढळतात. हेही वाचा: Byju’s : ‘बायजू’च्या तोट्यात 20 पटींनी वाढ, वित्तीय कामगिरीचा अहवाल आला समोरअसं शोध फेक अॅप…थोडी काळजी घेतल्यास, तुम्हीही बनावट अॅप्स शोधू शकता. लोन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी प्ले स्टोअरवर असलेले त्याचे रेटिंग बघा. जर एखादं बनावट अॅप असेल, तर तुम्हाला रेटिंग आणि रिव्ह्यूमधून त्याची माहिती मिळेल. तसेच हे अॅप कोणत्या कंपनीचं, त्याचा डेव्हलपर कोण आहे हे पाहा. तुम्हाला पूर्ण खात्री झाल्यानंतरच ते डाउनलोड करा. गुगलच्या टर्म्सनुसार, एखादं लोन अॅप NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीशी) संबंधित असणं आवश्यक आहे. तसं नसेल तर सावधगिरी बाळगा. बनावट अॅप्स युजरकडून अनेक प्रकारची माहिती विचारतात. अशा प्रकारे तुम्ही फसवणूक टाळू शकता…स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) फसवणूक टाळण्यासाठी ट्विटद्वारे काही माहिती दिली आहे. त्याप्रमाणे कोणतेही इन्स्टंट लोन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याची पडताळणी करा. इतर ठिकाणांहूनही माहिती गोळा करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा. अनधिकृत लोन अॅप्स अजिबात वापरू नका. हेही वाचा: Islamic State : ‘इस्लाम’ वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहनयामुळं तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो तुमचा डेटा चोरी होऊ नये यासाठी फोनमधील परमिशन देणं टाळा. यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग तपासा. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक होणार नाही. तुम्हाला फसवणूक झाली आहे असं वाटल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा. कर्ज घेण्यापूर्वी योग्य काळजी घ्यावी. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. फसवणूक झाल्यास, सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी https://cybercrime.gov.in ला भेट देऊ शकता.