Marathi Serial TRP: दीपा, अरुंधतीला मागे सारत ‘ही’ मालिका ठरली नंबर 1..

Home » Marathi Serial TRP: दीपा, अरुंधतीला मागे सारत ‘ही’ मालिका ठरली नंबर 1..
Marathi Serial TRP: दीपा, अरुंधतीला मागे सारत ‘ही’ मालिका ठरली नंबर 1..

ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका ‘टीआरपी’च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. गेली काही महीने ‘स्टार प्रवाह’ वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका होती. पण यंदा मात्र या मालिकेला मागे सारून नवा विक्रम झाला आहे. (tujhech mi geet gaat ahe serial number one in trp star pravah aai kuthe kaay karte rang maza vegla) टीआरपीच्या शर्यतीतही स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका टॉप 5मध्ये आहेत. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका अनेक महिने पहिल्या क्रमांकावर होती. शिवाय ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचेही रेटिंग जास्त होते. पण या दोन्ही मालिकांना मागे सारून ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने यंदा पहिला नंबर पटकावला आहे. Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 1 hours agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours ago’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला इतके प्रेम देऊन नंबर 1 वर पोहोचवल्याबद्दल मालिकेच्या संपूर्ण टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मागील आठवड्यात तुझेच मी गीत गात आहे मालिता पाचव्या क्रमांकावर होती. एकाच आठवड्यात मालिकेनं मोठी उडी घेतली आहे. प्रेक्षकांकडूनही मालिकेचं कौतुक करण्यात येत आहे. मालिकेत सध्या प्रचंड भावुक ट्रॅक सुरू आहे. छोटी चिमुकली म्हणजेच अवनी तायवडे हिनं तिच्या निरागस अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिचा सहज सुंदर अभिनयानं मालिकेला पहिल्या नंबरवर पोहोचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, पल्लवी वैद्य, उर्मिला कोठारे सारख्या कलाकारांची फौज मालिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.