टेक्नोहंट : सॅटेलाईट कम्युनिकेशनचे नवे पर्व

Home » टेक्नोहंट : सॅटेलाईट कम्युनिकेशनचे नवे पर्व
टेक्नोहंट : सॅटेलाईट कम्युनिकेशनचे नवे पर्व

ॲपलने नुकतेच ‘आयफोन १४ सिरीज’ लॉन्च केला. यंदाच्या आयफोनमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन (उपग्रहीय संवाद) हे खास फीचर देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेल्युलर नेटवर्क नसतानाही संपर्क साधण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. ही फीचर कसे काम करते, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, याबाबत माहिती….एखाद्यावेळी अचानक मोबाईलचे नेटवर्क गेल्यास आपली बरीच गैरसोय होते. कुणाशीही संपर्क साधताना त्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता विविध नवतंत्रज्ञान समोर येऊ लागले. अशाच प्रकारे नुकत्याच लॉन्च झालेल्या ‘आयफोन १४ सिरीज’मध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन हे खास फीचर देण्यात आले आहे. सेल्युलर नेटवर्क नसल्यास मोबाईलवरून संपर्क साधता येत नाही. अशावेळी ‘आयफोन १४’मधील सँटेलाईट कम्युनिकेशन या फीचरच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येते. थेट उपग्रहीय लहरींद्वारे आयफोनवरून संपर्क साधता येईल.‘आयफोन १४’मध्ये नेटवर्क नसताना युजर्सना ”इमर्जन्सी टेक्स्ट व्हाया सॅटेलाईट” हा पर्याय वापरता येतो. जेव्हा तुम्ही हे फीचर सुरू कराल, त्यावेळी तुमच्या आयफोनवर हे फीचर कसे वापरायचे, उत्तम सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी कशी मिळवायची याबाबत माहिती देण्यासाठी एक विंडो सुरू होते. त्याच्या मदतीने सॅटेलाईट कम्युनिकेशन हे फीचर वापरता येते. त्यानुसार फाइंड माय ॲपच्या मदतीने युजर आपत्कालीन परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या प्रदात्यांशी संपर्क साधू शकतात. यामध्ये लोअर अर्थ ऑर्बिटमधील (एलईओ) उपग्रहाशी आयफोन कनेक्ट केला जातो. सामान्यतः हे उपग्रह पृथ्वीपासून जवळपास ६५० ते १६०० किमी अंतरावर असतात. या उपग्रहांच्या मदतीने कुठलाही अडथळा नसताना मेसेज पाठवण्यास किमान १५ सेकंद लागतात. डोंगरदऱ्या, दाट झाडी असल्यास साधारण १ मिनिट लागतो.भारतात कधी मिळणार सेवा?सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी हे फीचर सध्या ‘आयफोन १४ सिरीज’मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. शिवाय सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात आयओएस १६ चे नवे अपडेट आल्यावर अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये ही सेवा मिळणार आहे. भारतात मात्र सॅटेलाईट फोन वापरण्यासाठी अनेक बंधने आहेत. थराया किंवा इरिडियम सॅटेलाईट फोन वापरण्यास इंडियन वायरलेस ॲक्ट आणि इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अंतर्गत बंदी आहे. त्यामुळे भारतात सर्वसामान्य नागरिकांना सॅटेलाईट फोनचा वापर करण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागू शकते.‘ग्लोबलस्टार’शी करारॲपलने सॅटेलाईट कम्युनिकेशन या फीचरसाठी ग्लोबलस्टार या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीशी करार भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत ॲपलकडून या फीचरसाठी ग्लोबलस्टारच्या ८५ टक्के नेटवर्कचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी स्पेसएक्स आणि गुगलनेही सँटेलाईट फीचर्सबाबत याबाबत घोषणा केली आहे. त्यातही गुगलकडून आगामी अँड्रॉइड १४ स्मार्टफोनमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन या फीचरचा सवेश करण्यात येणार आहे.गोपनीयतेचे काय?सॅटेलाईट कम्युनिकेशनद्वारे होणारा प्रत्येक संवाद हा एन्क्रिप्टेड स्वरूपात असेल. त्यामुळे त्यातून युजर्सच्या गोपनीयता, खासगीपणाला कुठलाही धोका पोचणार नाही, असे ॲपलकडून जाहीर करण्यात आले.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours ago