चिंताजनक बाब; परकी गंगाजळीतील घट गंभीर

Home » चिंताजनक बाब; परकी गंगाजळीतील घट गंभीर
चिंताजनक बाब; परकी गंगाजळीतील घट गंभीर

मुंबई : रुपयातील घसरण रोखण्यासाठी देशाचा परकी चलन साठा वेगाने खर्च होत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे मत काही अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा जानेवारी ते जुलै या कालावधीत रिझर्व्ह बँकेने ३८.८ अब्ज डॉलर परकी चलनाची विक्री केली आहे. योपैकी जुलैमध्ये १९ अब्ज डॉलरची विक्री करण्यात आली असून, ऑगस्टमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत ८०पेक्षा खाली गेल्याने त्याची आणखी घसरण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक २०१३ मधील संकटकालीन कालावधीच्या तुलनेत रुपयाला बळ देण्यासाठी आता परकी चलन साठ्याचा वापर वेगाने करत आहे. रुपयातील अस्थिरता रोखण्यासाठी आणखी परकी चलन साठा कमी होणे हा मोठा धोका आहे,” असे अर्थतज्ज्ञ गरीमा कपूर आणि शुभंकर संन्याल यांनी म्हटले आहे. अमेरिकी रोख्यांची खरेदी कमी करण्याच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने २०१३ मध्ये रुपयासह विकसनशील देशांच्या चलनांवरील दबाव वाढला होता. त्यामुळे रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे १४ अब्ज डॉलरची विक्री केली होती. त्यापेक्षा अधिक विक्री सध्याच्या काळात झाली आहे. त्यावर्षातील परकी गंगाजळीपेक्षा आता चलनसाठा अधिक आहे.देशाचा परकी चलन साठा ऑक्टोबर २०२१ मधील ६४२ अब्ज डॉलरवरून ५५० अब्ज डॉलर या दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. परकी चलन साठ्यात झालेली घट आणि आयातीतील वाढ यामुळे सध्याची परकी गंगाजळी सुमारे नऊ महिन्यांची आयातीसाठी पुरेशी आहे.चिनी युआनच्या तुलनेत रुपया आठ टक्के वाढला आहे. ही महत्त्वाची बाब आहे. कारण चिनी निर्यात ही भारताच्या निर्यातीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशांतर्गत भारतीय उत्पादनासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मानली जाते.- माधवी अरोरा, एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मुख्य अर्थतज्ज्ञRecommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या9 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ21 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप27 minutes ago