IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

Home » IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड
IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

IND vs AUS 2nd T20 Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपुरात होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू नागपुरात पोहोचले आहेत. मोहाली ते नागपूर या प्रवासाचा एक छोटा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.जामठा स्टेडियमवर कसोटी असो वा वनडे सामना प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध भारताचे रेकॉर्ड नेहमीच चांगले राहिलेले आहे; मात्र टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी संमिश्र ठरली आहे. या मैदानावर झालेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळविला असून, दोन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत2 hours agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 hours agoहेही वाचा: INDW vs ENGW: हरमनप्रीतचे शतक, 23 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडमध्ये ODI मालिका२००९ पासून आतापर्यंत जामठा स्टेडियमवर विविध संघांमध्ये एकूण १२ टी-२० सामने खेळल्या गेले. भारतीय संघ चार सामने खेळला. यातील श्रीलंका (डिसेंबर २००९) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या (मार्च २०१६) पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली. जानेवारी २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच धावांनी व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत बांगलादेशचा ३० धावांनी पराभव केला.हेही वाचा: T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप आधी ही डोकेदुखी’उल्लेखनीय म्हणजे या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकही टी-२० सामना खेळलेला नाही. याउलट कसोटी व वनडेमध्ये मात्र भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.