iPhone 14 मॉडेलमध्ये सिम कार्ड स्लॉट नसणार, मग कॉलिंग कसे होईल?

Home » iPhone 14 मॉडेलमध्ये सिम कार्ड स्लॉट नसणार, मग कॉलिंग कसे होईल?
iPhone 14 मॉडेलमध्ये सिम कार्ड स्लॉट नसणार, मग कॉलिंग कसे होईल?

टेक कंपनी Apple ने अलीकडेच iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे आणि त्यात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, यातील एक बदल युजर्सच्या अडचणी वाढवू शकतो. Apple ने नवीन सीरीजमधून सिम कार्ड ट्रे काढून टाकला आहे, याचा अर्थ वापरकर्त्यांना नवीन मॉडेल्समध्ये सिम कार्ड घालण्याचा पर्याय दिला जाणार नाही. युजर्सनी फक्त ई-सिम वापरावे अशी कंपनीची इच्छा आहे.लॉन्च इव्हेंट दरम्यान, Apple ने iPhone 14 सीरीज पूर्णपणे ई-सिमवर आधारित असेल आणि फिजीकल सिम कार्ड वापरता येणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे हा बदल आत्तापर्यंत फक्त यूएसमध्येच करण्यात आला आहे आणि भारतीय वापरकर्त्यांना याची काळजी करण्याची गरज नाही.Apple ने सिम कार्ड ट्रे का काढला?Apple ने आयफोनच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहेत, आधी फोनमधून 3.5mm ऑडिओ जॅक काढून टाकण्यात आला आणि नंतर टच आयडी काढून फेस आयडी आणण्यात आले. कंपनीला कमीत कमी होल्स आणि पोर्ट्स असलेले क्लिन डिव्हायसेस बनवायचे आहेत. याचाच भाग म्हणून कंपनी आता फोनमधून सिम कार्ड ट्रे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आता कॉलिंग आणि इतर कामे कशी होणार?फिजीकल सिम कार्ड ट्रे देण्यात येण्यात नसल्याने वापरकर्ते प्लास्टिकचे सिम कार्ड वापरू शकणार नाहीत. त्यांना टेलिकॉम ऑपरेटरकडून ई-सिम घ्यावे लागेल, जे फोनमध्ये कोणतेही कार्ड न घालता कोणताही नंबर वापरण्याची परवानगी देते. हे तंत्रज्ञान सध्याच्या आयफोन मॉडेल्समध्ये आहे, परंतु त्यामध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड देखील इंस्टॉल केले जाऊ शकते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर1 hours agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त1 hours agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.1 hours ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम1 hours agoहा पर्याय भारतातही उपलब्ध आहे का?रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्या भारतात ई-सिमचा पर्याय देतात. यासाठी, तुम्ही जवळच्या स्टोअरला भेट दिल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर किंवा घरी बसून केवायसीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर Apple किंवा इतर प्रीमियम डिव्हाइसमध्ये ई-सिम सक्रिय करू शकाल. मात्र, वारंवार सिमकार्ड बदलणाऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अडचणीचे ठरू शकते.