INDW vs ENGW: हरमनप्रीतचे शतक, 23 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडमध्ये ODI मालिका

Home » INDW vs ENGW: हरमनप्रीतचे शतक, 23 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडमध्ये ODI मालिका
INDW vs ENGW: हरमनप्रीतचे शतक, 23 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडमध्ये ODI मालिका

India vs England Women Cricket 2nd ODI Match : भारतीय महिला संघाने मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करत मोठा विक्रम केला. कॅंटरबरी येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने 143 धावांची नाबाद खेळी खेळली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.भारतीय संघाने जवळपास 23 वर्षांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. त्याने 1999 नंतर इंग्लंडच्या भूमीवर पहिली वनडे मालिका जिंकली होती. इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर दोनदा वनडे मालिका जिंकली आहे.Recommended Articlesतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन3 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 3 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प4 hours agoहेही वाचा: Women’s T20 Asia Cup : हरमनप्रीतकडेच भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 143 धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधाराच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत 80 धावा जोडल्या आणि 50 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येसमोर इंग्लंडचा संघ संपूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि 44.2 षटकांत 245 धावांत गारद झाला. डॅनियल वॅटने सर्वाधिक 65 धावा केल्या. रेणुका सिंगने 57 धावांत चार बळी घेतले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल.