Women’s T20 Asia Cup : हरमनप्रीतकडेच भारतीय महिला संघाचे नेतृत्व

Home » Women’s T20 Asia Cup : हरमनप्रीतकडेच भारतीय महिला संघाचे नेतृत्व
Women’s T20 Asia Cup : हरमनप्रीतकडेच भारतीय महिला संघाचे नेतृत्व

मुंबई : बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० आशिया क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर कायम ठेवण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघच या वेळी कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय महिला संघात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, के. पी. नवगिरे व राधा यादव या खेळाडूंचा समावेश आहे. स्मृती मानधना महाराष्ट्राच्या संघातून खेळत होती. के. पी. नवगिरे हीदेखील महाराष्ट्राच्या संघातून खेळली; पण पुरेशी संधी मिळत नसल्यामुळे तिला नागालँड संघाचे प्रतिनिधीत्व करावे लागले. जेमिमा रॉड्रिग्स ही मुंबई संघातून खेळत आहे. तसेच राधा यादवही याआधी मुंबईतून खेळत होती; पण आता ती बडोद्या संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.१५ ऑक्टोबरला जेतेपदाचा फैसलाअखिल भारतीय महिला निवड समितीने बांग्लादेशमधील ‘सिल्हेट’मध्ये १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आशियाई करंडकात सात देशांचा समावेश आहे. यजमान बांगलादेशसह भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया व अमिराती हे देश जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना झुंज देणार आहेत. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील. १३ ऑक्टोबरला उपांत्य फेरीच्या लढती होतील. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा फैसला १५ ऑक्टोबरला होणार आहे. श्रीलंकेत या स्पर्धेचे दोन वेळा आयोजन करण्यात आले आहे. भारत व पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी एक वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये प्रथमच ही स्पर्धा होणार आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.2 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.2 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoभारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, एस. मेघना, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि के. पी. नवगिरे. राखीव खेळाडू ः तानिया भाटिया आणि सिमरन दिल बहादूर.सहा वेळा जेतेपदाचा मानभारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रिकेट करंडकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.आतापर्यंत झालेल्या सातपैकी सहा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावण्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.पहिल्या चार सत्रांमध्ये ही स्पर्धा एकदिवसीय क्रिकेटच्या रुपात खेळवण्यात आली. पण २०१२पासून टी-२०रुपात खेळवण्यात येत आहे.बांगलादेशचा महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. २०१८मध्ये मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता.