WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशात

Home » WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशात
WTC फायनलवर इंग्लंडचीच मक्तेदारी; 2023 अन् 2025 चीही फायनल इंग्रजांच्या देशात

WTC Final : आयसीसीने 2023 आणि 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स या इंग्लंडमधील ओव्हल आणि लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जुलै महिन्यात बर्मिंगहम येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेवेळी इंग्लंडला दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सचे आयोजक करण्यात आले होते. 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल देखील इंग्लंडमध्येच झाली होती. हेही वाचा: ICC Ranking : अव्वल स्थानावर सूर्याचा डोळा! बाबरला टाकले मागे आता रिझवान रडारवरआयसीसीने 2023 आणि 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोठे होणार याची घोषणा केली मात्र अजून याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. काही दिवसातच या दोन्ही फायनल्सची तारीख देखील जाहीर केली जाईल. आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी ‘आम्हाला आनंद आहे की पुढच्या वर्षी WTC फायलनचा आयोजक द ओव्हल असणार आहे. त्यानंतर आम्ही 2025 ची फायनल लॉर्डवर खेळवणार आहोत.’ असे वक्तव्य केले होते.ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात साऊथम्प्टनमध्ये झालेला अंतिम सामना रोमांचक झाला. मला आशा आहे की जगभरातील क्रिकेट चाहते द ओव्हलवर होणाऱ्या WTC फायनलची वाट पाहत आहेत.’ पहिल्या WTC फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहरIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या16 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.21 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ39 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप45 minutes agoहेही वाचा: ICC New Cricket Rule : नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली ‘ही’ कला लुप्त होणार?मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) चे सीइओ आणि सचिव गे लेवेंडर यांनी सांगितले की, ‘2025 ला लॉर्ड्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे यामुळे आम्ही खूप खूष आहोत.’ WTC ची दुसरी फेरी ही 4 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही फेरी पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सद्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.