तणावामुळे गर्भपात होतो का? या दिवसांतील तणाव दूर करण्यासाठी काय करावे पहा?

Home » तणावामुळे गर्भपात होतो का? या दिवसांतील तणाव दूर करण्यासाठी काय करावे पहा?
तणावामुळे गर्भपात होतो का? या दिवसांतील तणाव दूर करण्यासाठी काय करावे पहा?

आई होणं हे प्रत्येक मुलीसाठी आणि त्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. आई होण्यासारखं दुसर सुख दुसरं कोणतं नसतं असे अनेक महिलांना सांगतात. हा काळ कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक विस्मरणीय काळ असतो. जो त्या आईच्या आणि बाळाच्या एका नव्या आयुष्याचा भागीदार असतो. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या जीवनात अनेक शारीरिक, भावनिक बदल होत असतात. या बदलांमुळे महिलांना बऱ्याचवेळा काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यातील एक मोठा बदल म्हणजे ताण होय. या दिवसांत महिलांमध्ये ताण येणं ही बाळ आणि आई दोघांच्या आरोग्यासाठी निरोगी नसते. अनेक महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलामुळे तणाव जाणवू लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम जाणवायला लागतो.Recommended ArticlesPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.2 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoहेही वाचा: Health : वजन कमी करण्याच्या प्रवासात ‘हे’ 2 ज्यूस करतील मदत; पाहा कोणते..दरम्यान, एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या स्त्रिया सतत तणावाखाली असतात अशांना या काळात जास्तीचा तणाव जाणवतो. या तणावामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बहुतेक स्त्रियांना हा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात तणावमुक्त वातावरण उत्तम असते.तणाव हे गर्भपाताचे कारण असू शकते का?अनेक शास्त्रज्ञांचा मते, तणावामुळे स्त्रीयांच्या शरीरात एक साखळी तयार होते. ज्याचा परिणाम वाढत्या गर्भावर नकारात्मकरित्या होत असतो. गर्भधारणेदरम्यान सततचा ताण किंवा तणावाची पातळी वाढल्याने गर्भधारणेची संभाव्य गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे या काळात तणावामुळे गर्भपात होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मात्र अनावश्यक गुंतागुंत टाळण्यासाठी महिलांनी गरोदर असताना तणाव घेणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनीही दिला आहे.हेही वाचा: तुम्हालाही रात्री अंघोळ करायची सवय आहे का? मग हे वाचाचवैज्ञानिक संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते, तेव्हा मेंदू CRH (कॉर्टिकोट्रॉफिन-रिलीझिंग हार्मोन) नावाच्या संप्रेरकासह अनेक हार्मोन्स सोडू लागतो. प्रसूतीदरम्यान गर्भाशयाचे आकुंचन थांबवण्यासाठी CRH ची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र हा तणाव अधिक काळासाठी असेल तर गर्भाशयातील CRH संप्रेरक मास्ट पेशींवर हल्ला करू शकतात. ज्यामुळे गर्भपातास कारणीभूत ठरणारी रसायने शरीरातून बाहेर पडतात.गरोदरपणात तणाव दूर ठेवण्यासाठी काय कराल?तणावापासून दूर राहण्यासाठी गरोदरपणात दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. गर्भधारणेदरम्यान भावनिक आधार घेण्यास अजिबात संकोच करू नका. यासाठी तुमच्या कुटुंबियांची किंवा मित्रांची मदत घ्या. तुमच्या चिंता आणि समस्या त्यांच्याशी शेअर करून तुमचे हृदय हलके करा. गरोदरपणात स्वतःला जास्त ताण देणे टाळा. अशावेळी जास्त काम करणे टाळा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा इतरांना मदत करण्यास सांगा. तुम्हाला पुरेशी विश्रांती आणि झोप मिळेल याची खात्री करा. काम करत असाल तर अशावेळी वारंवार ब्रेक घेतल्याने तुम्ही स्वतःला तणावापासून दूर ठेऊ शकाल. तुमचा कामाचा भार कमी करण्यासाठी आणि ते लवचिक बनवण्यासाठी नोकरी करणाऱ्या महिला तुमच्या बॉसशी बोला. तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही चांगली मसाज, आरामदायी स्पा थेरपी, रिफ्लेक्सोलॉजी, ध्यान, योग आणि संगीत यांचाही अवलंब करू शकता.