Queen Elizabeth यांनी जपून ठेवलेलं गांधीजींचं खास गिफ्ट; PM मोदींनी सांगितला किस्सा

Home » Queen Elizabeth यांनी जपून ठेवलेलं गांधीजींचं खास गिफ्ट; PM मोदींनी सांगितला किस्सा
Queen Elizabeth यांनी जपून ठेवलेलं गांधीजींचं खास गिफ्ट; PM मोदींनी सांगितला किस्सा

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलं होतं. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींनी एलिझाबेथ द्वितीय यांना दिलेल्या खास भेटीचा किस्सा भारतीय जनतेला शेअर केला आहे.(Queen Elizabeth-2 Death pm narendra modi told a special story)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ”2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात राणी एलिझाबेथ II सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.” असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ11 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या14 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप17 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 21 minutes agoतर दुसऱ्या ट्विटमध्ये, ”महाराणी एलिझाबेथ II या आमच्या काळातील दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिलं. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मी दुखावलो आहे.” अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.