चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीव

Home » चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीव
चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीव

नवी दिल्ली – चार वर्षांच्या बाळाला फारस कळत नाही, असा आपल्या सर्वांचा समज आहे. मात्र आताच्या पिढी मुळातच अत्यंत हुशार आहे. याच असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका चार वर्षाच्या मुलाने रुग्णवाहिका बोलावून आपल्या बेशुद्ध आईचे प्राण वाचवल्याचं स्पष्ट झालं आहे. (boy saved mothers life News in Marathi)हेही वाचा: आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवेलहान मुलाने आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली होती. आईला बेशुद्ध पडताना पाहून मुलाने मदतीसाठी आपत्कालीन क्रमांकावर मदत मागितली होती. ऑस्ट्रेलियाच्या रुग्णवाहिका कंपनी तस्मानियाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. या मुलाचे नाव मॉन्टी असून त्याला आदल्या दिवशीच त्याच्या आईने इमर्जन्सी नंबर 000 डायल करायला शिकवले होते.आई बेशुद्ध पडल्याचं लक्षात आल्यानंतर मुलाने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपली आई वेंडीचा जीव वाचवण्यासाठी केला. घरात झटका आल्यानंतर मुलाची आई बेशुद्ध झाली होती.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.44 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoमुलाने रुग्णवाहिका तस्मानियाच्या फोन ऑपरेटरला सांगितले की “मम्मी कोसळली आहे. तसेच घरातील पाळीव कुत्रा भुंकत आहे. हे ऐकून पॅरामेडिकल स्टाफ चकीत झाला. असा परिस्थितीत मॉन्टीला काय करावे हे माहित होतं. तसेच त्याने सर्व सूचनांचे योग्य पालन केले होते. शिवाय तो संपूर्ण घटनेदरम्यान शांत होता. मॉन्टीला परिसरातील लोक सुपरहिरो म्हणत आहेत.मॉन्टीची आई वेंडी, म्हणाली की, “मला खूप अभिमान आहे, की मॉन्टी माझा छोटा मुलगा आहे. त्याने खरोखरच मोठे नुकसान वाचवले. वेंडी स्वत: एक परिचारिका आहेत. तिने आपल्या मुलांना फोन अनलॉक करणे, आणि आपत्कालीन परिस्थिती कशी हताळायची हे शिकवलं आहे.