अमेरिकेची पुन्हा पाकला मदत; 450 मिलियन डॉलरच्या F-16 डिलला दिली मंजूरी

Home » अमेरिकेची पुन्हा पाकला मदत; 450 मिलियन डॉलरच्या F-16 डिलला दिली मंजूरी
अमेरिकेची पुन्हा पाकला मदत; 450 मिलियन डॉलरच्या F-16 डिलला दिली मंजूरी

अमेरिकेने F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी पाकिस्तानला USD 450 मिलीयन (रु. 3600 कोटी) ची मदत मंजूर केली आहे. बिडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाचा निर्णय फिरवत पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानासाठी 450 दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणे खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून ते सध्याच्या आणि भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा यसस्वीपणे सामना करू शकतील. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानला दिलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत आहे. F-16 फायटर जेटच्या मदतीने पाकिस्तानने भारताचे मिग-21 विमान पाडल होते असे मानले जाते.अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीवरील हल्ल्यात मदत केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ही भेट दिली असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी संभाव्य विदेशी लष्करी विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन पाकिस्तानी हवाई दलाला सध्याच्या आणि भविष्यातील दहशतवादाच्या धोक्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता टिकवून ठेवण्यात मदत होईल.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoहेही वाचा: अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलगी सापडली पण… अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये पाकिस्तानला सर्व संरक्षण आणि सुरक्षा सहाय्य स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानला दिलेली ही पहिली मोठी सुरक्षा मदत आहे. 2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने दहशतवादी गट, अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत थांबवली होती.हेही वाचा: Cyrus Mistry : अपघातापूर्वी ताशी 100 चा वेग अन् 5 सेकंद आधी…; मर्सिडीजचा अहवाल काय?