घरात अचानक सापडलेल्या नोटांनी मिळवून दिले 47 लाख रुपये, नवरा-बायको झाले मालामाल

Home » घरात अचानक सापडलेल्या नोटांनी मिळवून दिले 47 लाख रुपये, नवरा-बायको झाले मालामाल
घरात अचानक सापडलेल्या नोटांनी मिळवून दिले 47 लाख रुपये, नवरा-बायको झाले मालामाल

एका वृद्ध जोडप्याला त्यांच्या घरातून ब्रिटिश चलनातील जुन्या नऊ नोटा सापडल्या आहेत. या नोटा 47 लाखांपेक्षा जास्त किमतीत विकल्या गेल्या होत्या. या नोटांच्या लिलावानंतर एकूण किंमत जाहीर होताच या जोडप्यालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या 9 नोटा 1916 ते 1918 या काळातील आहेत. या नोटा अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळेच लिलाव दरम्यान, किंमत करताना आश्चर्यकारक आकडा समोर आला आहे.विक आणि जेनेट हे वृद्ध जोडपे ब्रिस्टल (यूके) येथे राहतात. विक हा पेशाने बांधकाम व्यावसायिक असून निव्वळ तंत्रज्ज्ञ आहे. मात्र या नोटांच्या लिलावानंतर जेव्हा त्याला एका चॅनल शोमध्ये नोटांची एकूण किंमत सांगितली गेली तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही. यावेळी वृद्ध दाम्पत्याची नात डॅनियल स्मिथही उपस्थित होती. तिघांनाही किंमत कळताच आश्चर्य वाटले.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes agoहेही वाचा: Tourism : मनालीचा प्लॅन करताय? दिल्लीहून पोहोचण्यासाठी जाणून घ्या सर्वात स्वस्त मार्गविकला सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या 100 वर्षांपूर्वीच्या नोटा बीमिन्स्टरमधील एका घरातून सापडल्या, जेव्हा तो त्याची दुरुस्ती करत होता. हे जोडपे 58 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत. जेनेटने सांगितले की, या नोटा मौल्यवान असतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. या जुन्या नोटांमधून सुमारे साडेतीन लाख रुपये मिळतील, अशी आशा या जोडप्याने व्यक्त केली होती, एवढ्या रकमेतून दोघांनीही क्रूझवर डायमंड वेडिंग अॅनिव्हर्सरी साजरी करण्याचा विचार केला होता.या नोटांतून त्याला अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. जेनेट आणि विक नुकतेच पणजोबा आणि पणजी बनले आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन अनेक दिवसांपासून सुरु होते. दरम्यान, यातील पहिली नोट सुमारे 7 लाखांना विकली गेली आहे. यानंतर 5 पौंडांच्या 3 नोटा 14.73 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकल्या गेल्या आहेत. ज्या व्यक्तीने या नोटा खरेदी केल्या आहेत तो इंटरनॅशनल बँक नोट्स सोसायटीचा अध्यक्ष आहे.हेही वाचा: ऐन सणात इंधनाचे दर होणार कमी? जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे आजचे दरया सर्व नऊ नोटांची एकूण किंमत 47, 42, 271 रुपये होती. आता एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर हे जोडपे त्यांच्या भावी आयुष्यासाठी काही पैसे वाचवत क्रूझवर जाण्याचा विचार करत आहेत. जेव्हा या पती-पत्नीला सर्व नोटांची किंमत मिळाली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता हे जोडपे हे पैशांचा वापर करत क्रूझवर जाण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहेत.