बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

Home » बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

बाजार शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. 16 जूननंतर बाजारात शुक्रवारची सर्वात मोठी घसरण होती.  सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर निफ्टीने सुमारे 350 अंक गमावले. शुक्रवारच्या घसरणीत आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे, मेटल आणि ऑटो शेअर्सनाही मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचा फटका बसला. गुरुवारी ऑल टाइम हाय प्रस्थापित करणारा बँक निफ्टीही 400 हून अधिक अंकांनी घसरला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्सचीही जोरदार विक्री झाली. बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स घसरणीसह बंद झाले.शुक्रवारी सेन्सेक्स 1093 अंकांनी घसरून 58841 वर बंद झाला. निफ्टी 347 अंकांनी घसरून 17531 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 432 अंकांनी घसरून 40777 वर बंद झाला. मिडकॅप 921 अंकांनी घसरून 31495 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स घसरले. निफ्टी 50 पैकी 48 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव6 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 7 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.14 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ32 minutes agoहेही वाचा: Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..आज कशी असेल बाजाराची स्थिती ?निफ्टी शुक्रवारी 17777 च्या महत्त्वाच्या लेव्हलवर टिकू शकला नाही, जे बाजाराचा एकूण कल कमकुवत असल्याचे सांगत  असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. वोलेटिलिटी इंडेक्स इंडिया VIX ने देखील 7.8 टक्क्यांच्या वाढीसह 20 च्या लेव्हलजवळ पोहोचले आहे, जे बाजारातील वाढत्या अस्थिरतेचे लक्षण आहे. जोपर्यंत यूएस फेडचा व्याजदर वाढीबाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट होत नाही तोपर्यंत बाजारात हा कल कायम राहील अशी शक्यता आहे. याशिवाय, ECB आणि BOE देखील पुढील आठवड्यात त्यांचे आर्थिक धोरण जाहीर करतील, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता असेल.हेही वाचा: Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?शुक्रवारी बाजारात जोरदार विक्री झाली आणि ती सुमारे 2 टक्क्यांनी घसरून बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. आता जर निफ्टी 17500 च्या खाली गेला तर त्यात आणखी कमजोरी येईल. अशा परिस्थितीत मार्केटमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. विविध क्षेत्रांवर नजर टाकल्यास बँकिंग क्षेत्र अजूनही तुलनेने चांगले दिसते. निफ्टी डेली चार्टवर फॉलिंग ट्रेंड लाइनखाली गेल्याचे एलकेपी सिक्युरीटीजचे रुपक डे म्हणाले. डेली टाइम फ्रेमवर निफ्टी निअर टर्म मूव्हिंग एव्हरेज 20 EMA च्या खाली घसरला आहे. मोमेंटम ऑसिलेटरही बियरिश क्रॉसओव्हर देत आहे आणि तो डाउनट्रेंडमध्ये आहे. अशा स्थितीत बाजाराचा येणारा काळ कमकुवत दिसत आहे. निफ्टीला 17500 वर सपोर्ट आहे. जर ही पातळी तुटली तर तो 17350 च्या पातळीवर जाताना दिसेल. वर, 17700 वर रझिस्टेंस आहे.हेही वाचा: Share Market: पॉवर सेक्टरचा ‘हा’ शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदारआजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)टाटा कांझ्युमर्स (TATACONSUME)टेक महिंद्रा (TECHM)अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)इन्फोसिस (INFOSYS)एमआरएफ (MRF)ॲस्ट्रल (ASTRAL)बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)एल अँड टी (LTTS)भारतफोर्ज (BHARATFORG)नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.