आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय

Home » आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय
आजीचा बटवा: काळे मिरे अनेक आजारावर आहेत रामबाण उपाय

मिरे हे जगातील सर्वांत जुने व फार महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. चरकसंहिता, बृहत्संहिता व तमिळ वाङ्‌मयात त्याचे पुष्कळ उल्लेख आढळतात. इ. स. पाचव्या शतकात भारतातून ग्रीसला त्याची निर्यात होत असावी.मसाल्यात वापरण्यात येणाऱ्यापैकी एक काळे मिरे आहे. काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे. त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. मसाल्यात तिखट म्हणून याचा वापर केला जातो.भारतात मिरवेलीचे 75 पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत. केरळात कल्लुवल्ली, बालनकोट्टा, करिमुंडा आणि कोट्टानड हे जुन्या प्रकारांपैकी जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत. हे काळे मिरे जगात सर्वत्र पिकत नाही. मात्र, भारतात मोठ्याप्रमाणात पिकते. हे औषधी काळे मिरे अल्यामुळे जगभरातून याला मागणी आहे.हेही वाचा: आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या● डेंग्यू तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिरीचा मारक परिणाम होतो.● डासांची अंडी मिरीमुळे नष्ट होण्यास मदत होते. ● काळे मिरेची पावडर कर्करोग आणि पित्तविरोधी आहे.● पित्तामुळे पोटात गुडगुड किंवा भगभग होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.● मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूकही वाढते.● काळया मिरीमध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो. आणि पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे व्यक्तीच्या प्रकृतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात.● काळे मिरे आणि वेलदोडा (विलायची) समप्रमाणात घेऊन भुकटी करुन ती घेतल्यावर हगवणीवर गुणकारी ठकरे.● दरम्यान, काळ्या मिरीवर संशोधन करण्यात येत आहे. ● पायपॅरीनवर कॅन्सर प्रतिबंधक औषध म्हणून संशोधन करण्यात येत आहे. पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचा नायनाट करु शकते. तसेच पायपॅरीन हे जनावरांनासुद्धा उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर29 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त30 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.30 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम36 minutes ago

Leave a Reply

Your email address will not be published.