दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी

Home » दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी
दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना (French Foreign Minister Catherine Colonna) यांच्या भारत भेटीपूर्वी, दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडं जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) दहशतवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर (Terrorist Mohiuddin Aurangzeb Alamgir) आणि अली कासिफ जान (Ali Kashif Jan) यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी (International Terrorist) म्हणून घोषित करण्याचं आवाहन केलंय.मंत्री म्हणून कोलोना पहिल्यांदाच भारतात येत आहेत. यादरम्यान त्या 14-15 सप्टेंबर रोजी दिल्लीत असतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांच्या मते, औरंगजेब आलमगीर उर्फ ​​मुजाहिद भाई आणि अली कासिफ जान उर्फ ​​अली कासिफ यांना UAPA 1967 कायद्यान्वये 12 एप्रिल रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयानं दहशतवादी घोषित केलं होतं. हे दहशतवादी पाकिस्तानातील बहावलपूर आणि चारसद्दाचे आहेत. 2019 मध्ये पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आहेत. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग2 hours agoहेही वाचा: माफी मागणार नाही म्हणत ‘आप’च्या नेत्यानं पत्रकार परिषदेतच फाडली उपराज्यपालांची नोटीसमंत्री कोलोनांच्या भारत भेटीमुळं दोन्ही देशांमधील संबंध दृढ होणारआलमगीर जैश-ए-मोहम्मदसाठी कट रचण्यात, निधी उभारण्यात सहभागी आहे. अफगाण दहशतवाद्यांची जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादी घटनांमध्येही आलमगीरचा हात आहे. दुसरीकडं, खायबर पख्तूनखा चौरसद्दा येथील रहिवासी अली कासिफ हा जैशचा सक्रिय ऑपरेशनल कमांडर आहे. अली कासिफ 2016 मध्ये पठाणकोटमधील एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात आणखी अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. एलओसीच्या सियालकोट भागातून तो आपलं नेटवर्क चालवतो. काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्यातही त्याचा सक्रिय सहभाग आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आणि घेतलेल्या निर्णयानंतर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री कोलोना यांच्या या भेटीमुळं दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत.हेही वाचा: Amit Shah : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; संशयित व्यक्तीला पोलिसांनी केली अटक