बँक ठेवीदारांनो, सतर्क राहा!

Home » बँक ठेवीदारांनो, सतर्क राहा!
बँक ठेवीदारांनो, सतर्क राहा!

आपले हक्काचे पैसे आपणास केव्हाही मिळतील, या उद्देशाने आपण बँकेत मुदत ठेव ठेवतो. सामान्यत: आपण बँकेत मुदत ठेव दोघांच्या नावाने ठेवतो आणि Either or Survivor किंवा Former or Survivor अशा प्रकारच्या स्थायी सूचना देतो. यातील प्रथम खातेदारास किंवा दुसऱ्या खातेदारास मुदत ठेवीची रक्कम मुदतीनंतर बँक देते.पण मुदतपूर्व पैसे लागल्यास बहुतेक बँका एका खातेदारास पैसे देण्यास नकार देतात. उदा. १) एका खातेदाराचा मृत्यु झाल्यास, २) एक खातेदार दवाखान्यात असेल तर, ३) एक खातेदार सही करु शकत नसेल तर, ४) एक खातेदार बाहेरगावी गेला असल्यास, ५) अन्य कोणत्याही कारणाने जर एकाच खातेदारास पैसे काढण्याची वेळ आल्यास, बँक मुदत ठेवीतील रक्कम काढू देते का?, मुदतपूर्व पैसे मिळतील का? तर बहुतेक बँका पैसे देण्यास नकार देतात.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव6 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 7 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.14 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ32 minutes agoअलीकडेच, विल (मृत्युपत्र) च्या संदर्भात मला भेटलेल्या एका वयस्कर (वय वर्षे ९१) व्यक्तीने आपल्या पत्नीसह रु. ५० लाखांची ठेवपावती केली होती. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने ते बाहेर पडू शकत नव्हते आणि सही पण करू शकत नव्हते. त्यांच्या पत्नीस (वय वर्षे ८८) बँकेने एका सहीवर मुदत ठेवीचे पैसे देण्यास नकार दिला. माझ्या ओळखीच्या महिलेचे (वय वर्षे ८५) एका छोट्या अपघातात हाड मोडले, त्यांना दवाखान्यासाठी पैसे हवे होते. पण बँकेने एका सहीवर ठेवपावती मोडण्यास नकार दिला, मुदत संपल्यावरच पैसे मिळतील, असे सांगितले.अशा पावतीचे पैसे, मुदतपूर्व गरज भासल्यास सर्व ठेवीदारांच्या सह्या असल्याशिवाय बँका देत नाहीत, असा अनुभव अनेकांना येतो. यावर बँकेचे असे म्हणणे असते, की हा एक करार आहे आणि तो मोडता येत नाही. ठेव ठेवताना ज्या सूचना दिलेल्या आहेत, ते मुदत संपताना पाळले जातील, असे बँकेचे म्हणणे असते. या नियमावर बोट ठेवून बऱ्याच बँका ठेवलेल्या पावतीचे पैसे ठेवीदारास देत नाहीत. या उलट काही बँका खाते उघडताना एक पत्र किंवा ‘अंडरटेकिंग’ घेतात आणि त्यात सर्व ठेवीदारांकडून लिहून घेतात, की गरज पडल्यास कोणत्याही एका ठेवीदारांस ठेवपावती मोडता येईल.एकाच्या सहीने पैसे काढता येतील. पण हे पत्र किंवा ‘अंडरटेकिंग’ सर्व बँका घेत नाहीत आणि ठेवीदार अडचणीत येतात. त्यामुळे बँका या ठेवीदारांच्या सोईचा किंवा ठेवीदारांचा विचार करताना दिसत नाहीत. गरज कधी कोणाला पडेल हे सांगता येत नाही. म्हणून सर्व ठेवीदारांनी आपल्या बँकेत, अडचण आल्यास कोणत्याही एका ठेवीदारांस ठेवपावती मोडता येईल आणि एकाच्या सहीने पैसे काढता येतील, असे पत्र किंवा ‘अंडरटेकिंग’ देऊन रितसर पोहोच घ्यावी, कारण ही काळाची गरज आहे. ठेवपावती करताना शक्यतो छोट्या रक्कमेच्या कराव्यात. एखाद-दुसरी पावती एकाच नावाने करावी. हे सर्व पर्याय आपल्या सोयीनुसार निवडावेत.खरे तर रिझर्व्ह बँकने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य तो निर्देश सर्व बँकांना द्यायला हवा आणि गरजूंना स्वत:चेच पैसे वेळेवर मिळतील, याची खात्री करायला हवी. पण तोपर्यंत सर्व ठेवीदारांनी सतर्क राहून योग्य ती पावले उचलावीत.(लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.)