Digital Skills : डिजिटल गॅरेज टूल्स आणि कौशल्ये

Home » Digital Skills : डिजिटल गॅरेज टूल्स आणि कौशल्ये
Digital Skills : डिजिटल गॅरेज टूल्स आणि कौशल्ये

डिजिटल गॅरेज ही संकल्पना सर्वप्रथम गुगलने ऑनलाइन जगतामध्ये प्रभावीपणे मांडली. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन उपस्थिती साधने, विपणन आणि जाहिरात साधने, स्थानिक आणि सामाजिक साधने, विश्लेषण साधने, निर्यात साधने, ई-कॉमर्स साधने आदी अद्ययावत डिजिटल स्किल्सच्या टूल्सचा समावेश होतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी विविध प्रकारची विशिष्ट कारणांसाठी उपलब्ध असलेली डिजिटल टूल्स सक्षमपणे वापरण्याच्या पद्धतींसाठी डिजिटल गॅरेजचा उपयोग होत आहे.गुगल माय बिझनेस वेबसाइट, लर्न माय वे, विक्स, जिमडो, टेस्ट माय साइट, जी सूट, गुगल माय स्टोअर आदीं टूल्स ही ऑनलाइन प्रेझेंन्ससाठी अत्यावश्यक असून त्यांच्या कार्यपद्धती डिजिटल गॅरेजमध्ये सविस्तरपणे कौशल्य-विस्ताराने उपलब्ध केलेल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग टुल्समध्ये गुगल अॅडस, बिंग अॅडस, ट्विटर अॅडस, फेसबुक अॅडस, लिंकडिन मार्केटिंग सोल्यूशन्स अशा अनेक डिजिटल टूल्सचा समावेश होतो.Recommended Articlesएकीचे बळ, मिळे भरघोस फळनागपूर : आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे अवघड. काहींच्या मते शेती हा तोट्याचा व्यवसाय असला तरीही मेहनत व योग्य नियोजनातून चांगली भरभराट होवू शकते. एकीच्या बळाने अवघड कामही सहज होते, असा मंत्र विचारवंतांनी दिला आहे. याच एकीच्या मंत्राचा आधार घेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपन5 minutes agoBold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे…बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.Sep 25, 2022बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022गुगल माय बिझनेस, बिंग प्लेसेस, फेसबुक फॉर बिझनेस, ट्विटर बिझनेस ही सारी टूल्स ‘लोकल व सोशल’ टूल्समध्ये समाविष्ट आहेत. निर्यात बाजारपेठ काबीज करण्यासाठी अनेक डिजिटल टूल्स वापरात येतात यामध्ये विशेषतः एक्स्पोर्ट ब्रिटेन, मार्केट फाईंडर या टूल्स वापराची कौशल्ये उपयोगी आहेत.ऑनलाइन अस्तित्वाद्वारे मॅग्नेटो, प्रेसटोशॉप, ईकॉमर्स, बिगकॉमर्स अशी विविध संसाधने ई-कॉमर्सच्या विविध पद्धतीही डिजिटल गॅरेजद्वारे अनेक कामे करताना उपयोगी ठरत आहेत.अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांचे डिजिटायझेशन करताना कोणती डिजिटल टूल्स त्या-त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियांसाठी योग्य आहेत व त्यांची निवड करण्याची कौशल्ये प्राप्त करणे हीसुद्धा रोजगार क्षमता वाढीसाठी प्रमुख गरज बनली आहे. त्यामुळेच डिजिटल कौशल्यांबरोबरच ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ पद्धतींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.डिजिटल प्रक्रिया परिवर्तन, खर्च कमी करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुनर्वापराचा वेळ कमी करण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुधार, व्यवसाय मॉडेल परिवर्तन, डोमेन परिवर्तन, आणि सांस्कृतिक व संघटनात्मक परिवर्तन आदींद्वारे ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ सहज शक्य झाले असल्याने या क्षेत्रातील कौशल्यधारकांची मागणी वाढते आहे.संस्थात्मक प्रणाली बदल आणि विकास, संगणकीय प्रणाली विचार, व्यवसाय प्रक्रिया विश्लेषण, लीन मॅनेजमेंट, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन, डिजिटल इनोव्हेशन आणि इतर सैद्धांतिक पैलूंबद्दलचे कौशल्य जे व्यवसाय परिवर्तनामध्ये योगदान देते अशा क्षमता धारकांनाही विविध संधी उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.