ICC New Cricket Rule : नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली ‘ही’ कला लुप्त होणार?

Home » ICC New Cricket Rule : नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली ‘ही’ कला लुप्त होणार?
ICC New Cricket Rule :  नव्या नियमांमुळे पाकिस्तानी बॉलर्सनी शोधलेली ‘ही’ कला लुप्त होणार?

ICC New Cricket Rule Use Saliva Prohibition : क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस फलंदाजांचे महत्व आणि वर्चस्व वाढत चाललं आहे असं आपण सातत्याने ऐकत आलो आहे. मात्र आता आयसीसीच्या नव्या नियमांमुळे क्रिकेटमध्ये आता गोलंदाज दुय्यम नाही गुलामासारखे असणार आहेत. गोलंदाजांची एक एक अस्त्र हळूहळू ही निरस्त्र करण्याचा जणू आयसीसीने विडाच उचलला आहे. चौकार आणि षटकाराला विकेटपेक्षा जास्त ग्लॅमर आहे. चाहत्यांच्या याच षटकार आणि चौकारांचा हव्यास सांभाळण्याच्या नादात आयसीसी बॅट आणि बॉल मधील समतोल बिघवडत आहे. हेही वाचा: Sachin Tendulkar : तेंडुलकरचा बॅटिंग पॅड घालून कुकिंग करतानाचा VIDEO व्हायरलआयसीसीने नुकतेच चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालणारा नियम लागू केला आहे. जेव्हा कोरोनाच्या संकटातही क्रिकेट विश्व न्यू नॉर्मल होत होते त्यावेळी खेळातील काही नियम तात्पुरत्या स्वरूपात बदलण्यात आले होते. त्यातील महत्वाचा नियम म्हणजे चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हा नियम मर्यादित काळासाठी लागू करणे समजू शकतो. मात्र आता आयसीसी हा नियम कायमस्वरूपी लागू करणार आहे.काही चाहते म्हणतील की चेंडूला लाळ लावणे हा किळवाणा प्रकार आहे. तो कशाला सुरू ठेवायचा? मात्र या लाळ लावण्यानेच क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाज ताठ मानेने वावरू शकले. पाकिस्तानच्या वेगावान गोलंदाजांच्या अनेक पिढ्या याच लाळ लावण्यामुळे भरभराटीस आल्या होत्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जगासमोर आणलेल्या रिव्हर्स स्विंगची कला ही मुख्यत्वेकरून चेंडूला लाळ लावण्यामुळेच एवढी यशस्वी झाली. वकार युनिस आणि वसिम अक्रमक यांच्या कारकिर्दित रिव्हर्स स्विंगचे महत्व अनन्यसाधारण होते. त्यामुळे जुन्या बॉलवर देखील वेगवान गोलंदाजांचा दरारा निर्माण झाला होता. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: Yuvraj Singh : चाहत्यांसाठी युवराजच्या गोव्यातील ‘हॉलिडे होम’मध्ये राहण्याची सुवर्ण संधीचेंडूला लाळ लावणे का आहे गरजेचे?चेंडूला लाळ लावण्यापेक्षा घाम लावला तर काय फरक पडतो असा प्रश्न समोर येणे स्वाभाविक आहे. मात्र लाळ आणि घाम यात मोठा फरक आहे. चेंडूला लाळ लावल्याने चेंडू थोडा जड होतो. त्यामुळे त्याचा रिव्हर्स स्विंग करण्यासाठी चांगला फायदा होतो. घाम लावून तुम्ही चेंडूच्या एका बाजूला चकाकी आणू शकता. मात्र त्याचा रिव्हर्स स्विंग होण्यास फारसा उपयोग होत नाही. गेल्या दोन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये जुन्या बॉलवर रिव्हर्स स्विंग झाल्याचे फारसे आढळून आलेले नाही.वनडेत तर रिव्हर्सच श्राद्ध केव्हांच घातलं गेलयं2011 मध्ये आयसीसीनं वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक नवीन बॉल अशी संकल्पना मांडली. म्हणजे एका एन्डने गोलंदाजी करण्यासाठी एक नवीन चेंडू आणि दुसऱ्या एन्डने गोलंदाजी करताना दुसरा नवीन चेंडू वापण्यात येऊ लागला. यामुळे एका चेंडूवर फक्त 25 षटकेच टाकली जाऊ लागली. यामुळेच आज आपण वनडेमध्ये फलंदाज 300 ते 350 धावांचा टप्पा सहजतेने पार करू लागले.25 षटके टाकलेला चेंडू तसा नवीनच असतो. त्यामुळे तो रिव्हर्स होणे शक्य नाही. कारण रिव्हर्स स्विंग हा जुन्या चेंडूवरच होतो. या दोन बॉल नियमाचा फिरकीपटूंना देखील तोटा सहन करावा लागतो. चेंडू टर्न होण्यासाठी थोडा जुना होणे देखील गरजेचे असते. मात्र लश ग्रीन स्टेडियमवर चेंडू किती जुना होणार?हेही वाचा: BCCI Election : 18 ऑक्टोबर; जय शहांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरली? रिव्हर्स स्विंग इतका का म्हत्वाचा?नवीन चेंडू हा पारंपरिक पद्धतीने स्विंग होतोच की मग रिव्हर्स स्विंगची काय गरज? मुळात फलंदाज आपला स्टान्स बदलून फटकेबाजी करू शकतो ते झालं त्याचं इम्पोव्हाजेशन. रिव्हर्स स्विंग हा देखील वेगवान गोलंदाजाच्या इंम्पोव्हाजेशनचाच एक भाग होता. यात चेंडूची सीम पोजिशन ही पारंपरिक स्विंगसाखी दिसायची मात्र चेंडू त्याच्या विरूद्ध दिशेला स्विंग व्हायचा. म्हणजे, आऊट स्विंगच्या सीम धरून टाकलेला चेंडू रिव्हर्स स्विंग म्हणजे इन स्विंग व्हायचा. फलंदाजाच्या भाषेत सांगायचं तर एखादा डावखुरा फलंदाज गोलंदाजाला चकवा देण्यासाठी आपली ग्रीप बदलून उजव्या हाताच्या फलंदाजाप्रमाणे ‘स्विच हिट’ मारतो तशीच काहीशी ही गोलंदाजीतला फलंदाजांना चकवा देण्यासाठी वापरण्यात येणारी क्लुप्ती होती. आता ती लुप्त झाली आहे.गोलंदाजांचे खच्चीकरण काही नवे नाही. यापूर्वी बाऊन्सरवर बंधने आणणे, नो बॉलवर फ्री हीट, खेळपट्ट्या फलंदाजांच्या वळचणीला बांधणे, फिल्डर्सची संख्या, पॉवर प्ले, यांच्यामाध्यमातून खेळातील समतोल आधीच नाहीसा झाला आहे.गंमत म्हणजे जर गोलंदाजाने बीमर टाकला त्याला वॉर्निंग देऊन त्याची बॉलिंगही बंद केली जाते. मात्र फलंदाजाने गोलंदाजाच्या दिशेने वेगाने फटका मारला तर तो असतो गुड शॉट! जर बीमरने सावध आणि स्थीर असलेला फलंदाज जखमी होऊ शकतो, तर फलंदाजाने वेगाने गोलंदाजाच्या दिशेने चेंडू मारला तर बेसावध गोलंदाज देखील जखमी होऊ शकतो मग फलंदाजाला बॉलरच्या दिशेने फटका मारण्यावर बंदी घालणार का?