‘मनी इन्शुरन्स’ म्हणजे काय?

Home » ‘मनी इन्शुरन्स’ म्हणजे काय?
‘मनी इन्शुरन्स’ म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे आपण लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल इन्शुरन्स, होम इन्शुरन्स यासारख्या इन्शुरन्स पॉलिसी गरजेनुसार घेत असतो. तथापि, आपल्याकडे असलेली रोख रक्कम, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींची (ज्यांची जोखीम अन्य बाबींपेक्षा जास्त असते) सहसा इन्शुरन्स पॉलिसी घेत नाही. मात्र, यातील जोखीम कमी करण्यासाठी आता मनी इन्शुरन्स पॉलिसी घेता येते. काय आहे ही पॉलिसी, हे आता आपण पाहू.ही एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी असून, जे व्यावसायिक आपले व्यवहार कॅश किंवा कॅशसदृश माध्यमातून करतात (उदा. चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड) त्यांच्यासाठी ही पॉलिसी निश्चितच उपयुक्त आहे. ही पॉलिसी घेतल्याने व्यावसायिकास कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड गहाळ होणे, चोरी होणे, आगीत जळणे वा खराब होणे यांपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळू शकते. याशिवाय तिजोरीतील कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड; तसेच ट्रान्झिटमधील कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड चोरी अथवा गहाळ झाल्याने होणाऱ्या नुकसानीचा क्लेम करून भरपाई मिळू शकते. तसेच पॉलिसीधारकाच्या वतीने अधिकृत व्यक्तीने जमा वा वसूल केलेली कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड यांचाही समावेश पॉलिसीत होतो.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज2 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु2 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स2 hours agoपुढील कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीचा क्लेम मिळत नाहीपॉलिसीधारक अथवा कार्यालयीन कर्मचाऱ्याची चूक असेल तरव्यवहार अनधिकृत व्यक्तीने हाताळला असेल तरकॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड जर व्यावसायिक जागेव्यतिरिक्त अन्य कोठे ठेवले असतील तर (व्यावसायिक जागेचा पत्ता पॉलिसी घेताना द्यावा लागतो व त्यासाठी आवश्यक तो पुरावा द्यावा लागतो.)कॅश घेऊन जाणाऱ्या वाहनास आवश्यक ती सुरक्षा पुरविली नसेल तरपूर/वादळ/युद्ध या कारणाने होणाऱ्या नुकसानीचा क्लेम या पॉलिसीतून मिळत नाही.ही पॉलिसी जनरल इन्शुरन्स कंपन्यांमार्फत दिली जाते. उदा. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, एसबीआय जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोम्बार्ड यासारख्या अन्य जनरल इन्शुरन्स कंपन्या ही पॉलिसी देऊ करतात.थोडक्यात असे म्हणता येईल, की व्यावसायिक आपल्याकडील रोख रक्कम, चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, गिफ्ट कार्ड, पोस्टल स्टॅम्प यातील असणारी जोखीम मनी इन्शुरन्स पॉलिसी घेऊन कमी करू शकतात.प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे!‘सकाळ मनी’ मासिकाच्या प्रत्येक अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. यासंदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न editor@sakalmoney.com या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)