Mohenjo-daro : पाकमधील पावसामुळे ‘मोहेंजोदडो’ धोक्यात

Home » Mohenjo-daro : पाकमधील पावसामुळे ‘मोहेंजोदडो’ धोक्यात
Mohenjo-daro : पाकमधील पावसामुळे ‘मोहेंजोदडो’ धोक्यात

इस्लामाबाद : पाकिस्तानला पुराने हाहाकार माजविला असून हजारो घरांचे नुकसान होऊन शेकडो लोकांचा मृत्यूही झाला आहे. पाकिस्तान सरकार बचावकार्य करत असले तरी प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष असलेल्या मोहेंजोदडो या ऐतिहासिक ठिकाणाकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याने सरकारवर टीका होत आहे. या ४५०० वर्ष प्राचीन शहराचे पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सिंधू नदीच्या जवळ मोहेंजोदडो या प्राचीन शहराचे अवशेष आहेत. सिंधु संस्कृतीचे प्रतीक असलेले शहर दक्षिण आशियातील सर्वांत उत्तमरित्या जतन करून ठेवलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. १९२२ मध्ये या ठिकाणाचा शोध लागला होता आणि त्यानंतर येथे झालेल्या उत्खननातून प्राचीन सिंधु संस्कृतीबाबत महत्त्वाची माहिती जगासमोर आली होती.पाकिस्तानात सध्या आलेल्या पुराने मात्र मोहेंजोदडोला धोका निर्माण झाला आहे. या वारसास्थळामध्ये पुराचे पाणी शिरले नसले तरी कोसळधार पावसामुळे मात्र या शहराच्या अवशेषांची काही ठिकाणी पडझड झाली असल्याचे येथील अधिकारी अहसान अब्बासी यांनी सांगितले. मोहेंजोदडो शहरातील अनेक उंची भिंती कोसळल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मोहेंजोदडो परिसराची ओळख असलेल्या बौद्धस्तुपाचे पावसामुळे नुकसान झालेले नाही. मात्र, या प्राचीन स्तुपाला अत्यंत सामान्य दर्जाच्या प्लॅस्टिकच्या कागदाचे आच्छादन घातल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरून पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ10 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या13 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप16 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 20 minutes ago