दानाचे महत्त्व

Home » दानाचे महत्त्व
दानाचे महत्त्व

आता पितृपक्ष सुरु झाला आहे. या पंधरवड्यात दानाचे महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथात, परंपरांमध्ये दानाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या पंधरवड्यात कुटुंबातील निवर्तलेल्या व्यक्तीचे स्मरण करावे, असे शास्त्र सांगते. प्रत्येक व्यक्तीला समाज देखील घडवीत असतो.जे आपल्याकडे आहे, त्यातील काही भाग हा ज्याच्याकडे काही नाही, त्याला देणे यालाच आपल्या संस्कृतीत ‘सत्कर्मी दान’ म्हणतात. आपल्या कमाईतील काही भाग हा समाजाचे ऋण परत करण्यासाठी व्यतीत करण्याची वृत्ती असणे वा निर्माण होणे; किंबहुना त्याची जाण असणे हे आजच्या युगात महत्त्वाचे आहे. दानामुळे किती लाभ होतो वगैरे चर्चा होत असते वा ती होत राहील; पण त्यातील एक सूत्र अचल आहे, ते म्हणजे दान केल्याने मानसिक समाधान नक्कीच लाभते. धर्मशास्त्रानुसार दान केले, की ती वस्तू आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. क्रिया-प्रतिक्रिया निरंतर सुरू राहते. त्यामुळे जे जेवढे देतो, त्याच्या कित्येक पटीने अधिक परत मिळते. दानासाठी पैसेच हवे असे नाही. सेवा ही सुद्धा दानातच येते. सेवा रुग्णाची करा किंवा गोरगरिबांची करा; नाहीतर देवाची करा. त्याचे फळ एकच आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव6 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 7 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.14 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ32 minutes agoदान आवश्यकसमाजउद्धारासाठी दान देण्याची उर्जा मिळावी म्हणून प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये ८०जी व इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. जोपर्यंत खर्च करण्याने काही तरी मिळत नाही, तोपर्यंत करदाता खर्च करण्यास तयार होत नाही. त्यामुळे दान (देणगी) देणाऱ्यांना करसवलत लागू केल्याने अनेकांनी सार्वजानिक न्यास स्थापून लोकसेवा सुरु केली आहे. पितृपंधरवड्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला असे दान करण्याची संधी चालून आली आहे. या कार्यामध्ये विविध गोष्टी केल्या जाऊ शकतात, जसे अन्नदान, गरीब मुला-मुलींसाठी शिक्षणखर्च करणे, पाणी-रस्ते, कपडे, रुग्णांची शुश्रुषा मदत, औषधे, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि अन्य बाबींसाठी सर्वसामान्य व्यक्तीसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून दान देता येऊ शकते.देणगीतून करसवलतहुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यापीठ, महाविद्यालये यांना परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षिसासाठी देणगी दिल्यास; तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या देणगीची उत्पन्नातून १०० टक्के वजावट मिळू शकते. पंतप्रधान मदत निधीसाठी दिलेले योगदानदेखील १०० टक्के उत्पन्नातून वजावटीसाठी भारतीय रहिवासी करदाते; तसेच अनिवासी भारतीयदेखील पात्र आहेत. अधिसूचित ग्रामीण विकास निधीला, वनीकरणासाठी अधिसूचित निधीला, अधिसूचित राष्ट्रीय गरीबी निर्मूलन निधीला दिलेली रक्कम, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक विज्ञान किंवा सांख्यिकीय संशोधन करणाऱ्या संशोधन संस्थेला दिलेली, ग्रामीण विकासाचा कोणताही कार्यक्रम हाती घेणाऱ्या मान्यताप्राप्त असोसिएशन किंवा संस्थेला दिलेली रक्कम देखील पूर्ण वजावटीसाठी पात्र आहे, ज्यात राष्ट्रीय हित सामावले आहे. अशी प्रत्यक्ष मदत करून आपण सामान्य नागरिक राष्ट्र उभारणीला मदत करू शकतो, समाजाचे काही प्रमाणात ऋण फेडू शकतो. या व्यतिरिक्त प्राप्तिकर विभागाकडे नोंदल्या गेलेल्या सार्वजनिक न्यासास दिलेल्या देणगीच्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम वजावटीस पात्र ठरू शकते. तथापि, अशी देणगी वस्तूरुपात देता येत नाही. नव्या नियमाप्रमाणे रोख रक्कम रु. दोन हजारांपेक्षा अधिक दिल्यास वजावटीस पात्र ठरत नाही.समाजाचे देणेज्या कंपन्यांचा नफा रु. पाच कोटीपेक्षा किंवा गंगाजळी रु. पाचशे कोटीपेक्षा किंवा वार्षिक उलाढाल रु. शंभर कोटींपेक्षा अधिक आहे, अशा कंपन्यांना ‘सीएसआर’ निधी खर्च करणे कायद्याने सक्तीचे करण्यात आले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती असलेली अलिखित जबाबदारी. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी समाजाला फायदा होईल असे कार्य केले पाहिजे, याची जाण असायला हवी. समाजाचे हेच देणे देण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नातून किमान १० टक्के भाग दरवर्षी खर्च करण्यासाठी सुरवातीला स्वेच्छेने व ते असफल झाल्यास सक्तीने भाग पाडणे गरजेचे ठरणार आहे. ही परोपकाराची वृत्ती जोपासल्यास समाजाची, पर्यायाने देशाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही!(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए आहेत.)