ONDC डिजिटल क्रांतीचे पुढचे पाऊल

Home » ONDC डिजिटल क्रांतीचे पुढचे पाऊल
ONDC डिजिटल क्रांतीचे पुढचे पाऊल

भारतातील लोकांचे बदलते जीवनमान, राहणीमान, वाढलेले उत्पन्न, स्मार्ट फोनचा वाढत वापर या गोष्टी ई-कॉमर्स व्यवहारवाढीसाठी मुख्यत्वे कारणीभूत आहेत. १९९१ नंतर नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्यावर जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्षितिजावर भारताचे दमदार पाऊल पुढे पडू लागले. देशात दूरसंचार क्षेत्रात अभूतपूर्व क्रांतीने अनेकविध संधी उपलब्ध केलेल्या दिसून येतात. देशातील बाजारपेठेत रिटेल क्षेत्रात अनेक स्वदेशी व परदेशी कंपन्या आपले बस्तान बसवू लागल्या.ई-कॉमर्स कंपन्या वस्तू व त्याचा पुरवठा आणि इतर सेवा थेट आपल्या दारी घेऊन आल्या व त्यांची एकाराधिकारशाही निर्माण होऊ लागली. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयाने डिजिटल कॉमर्ससाठी ‘ओपन नेटवर्क’ हा नवा उपक्रम चालू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ला (ओएनडीसी) प्रायव्हेट सेक्टर नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव6 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 7 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.14 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ32 minutes ago‘ओएनडीसी’चा उद्देश आणि महत्त्वकाही ठराविक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांची एकाधिकारशाही किराणा, खाद्य, रिटेल वस्तू, प्रसाधने आदी क्षेत्रात असून, ती कमी करण्यासाठी, तसेच देशातील लहान व्यापारी, लघु उद्योग, दुकानदार यांना बाजारपेठेत प्रवेश मिळून ई-कॉमर्स व्यवहार ‘ओपन नेटवर्क’ वापरून ग्राहकोपयोगी करणे, हा ‘ओएनडीसी’च्या स्थापनेचा मूळ उद्देश आहे. साधारणतः मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या इन्व्हेंटरी मॉडेल, मार्केट मॉडेल वापरतात. त्यातील ‘इन्व्हेंटरी मॉडेल’चा वापर अधिक करतात; ज्याद्वारे या कंपन्या मोठा नफा कमावत असतात. या कंपन्या मालाची घाऊक खरेदी, साठवणूक करून ठराविक वेळी, ठराविक शहरात विक्री करीत असतात. तसेच सणासुदीच्या दिवसात मोठी सवलत देतात आणि बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखतात. काही प्रसंगी माल उत्पादक उद्योग (ज्यात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीची प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा इतर हितसंबंध गुंतले असतात) यांना हाताशी धरून एका ठराविक केंद्रात कारखाना उभारला जातो. तेथे माल उत्पादन करून आणि किंमत-वाहतूक खर्च कमी करून मोठी विक्री केली जाते आणि त्यातून प्रचंड नफा मिळविला जातो. या गोष्टीला ‘ओएनडीसी’ कार्यरत झाल्यावर आळा बसू शकेल.‘ओएनडीसी’द्वारे देशातील लहान दुकानदार, घरगुती व्यावसायिक यांना सुद्धा वस्तूंची खरेदी-विक्री व अन्य सेवा ‘ओपन नेटवर्क’ने देता यावी, ई-कॉमर्स व्यापारात स्पर्धा निर्माण व्हावी, हा ‘ओएनडीसी’चा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची चाचणी दिल्ली, बंगळुरू, कोईमतूर, भोपाळ, शिलाँग या प्रमुख शहरात घेण्यात आली आहे.‘ओएनडीसी’चे कार्य कसे चालते?देशातील जवळपास २० मोठ्या संस्था ‘ओएनडीसी’मध्ये भांडवल गुंतवत आहेत; तसेच काही प्रमुख बॅंका गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. विक्रेता व ग्राहक यांना स्वतंत्रपणे वेगळ्या ‘ॲप’वर नोंदणी करून ते ‘ओपन नेटवर्क’सोबत जोडून व्यवहार करता येतील. ओएनडीसी यातील सर्व बाबी जसे की कॅटलॉग, मालाचे व ऑर्डरचे व्यवस्थापन यासाठी प्रमाणबद्ध सूची तयार करेल; ज्या पुरवठादार आणि ग्राहकाला सोयीनुसार वापरता येतील. ग्राहकाला आपल्या सोयीचे जवळचे दुकान, आवडीची वस्तू निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल. मालाची किंमत, वाहतूक खर्च हे स्पर्धात्मक ठेवणे आणि मालाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन या तीन महत्त्वाच्या बाबी यात असतील.‘ओएनडीसी’चे फायदेजेव्हा ग्राहक एक वस्तू पेटीएम ॲपवर शोधेल, त्यावेळी ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर तो जोडला जाऊन या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या अनेक विक्रेत्यांची यादी व दरपत्रक याची माहिती त्याला मिळेल. विक्रेता व ग्राहक दृकश्राव्य माध्यमाने जोडले जाऊन मालाची प्रत व किंमत ठरवू शकतील. मालाचा दर्जा, ब्रँड, किंमत, वाहतूक एजन्सी यांचे दर असे अनेक पर्याय ग्राहकाला निवडून डिजिटल व्यवहार पूर्ण करता येतील. ग्राहकाला आकर्षक व तुलनात्मक दर, गुणवत्तापूर्ण वस्तूंची निवड, ब्रँड, पुरवठादार, वाहतूकदार यांची सहज निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होतील. पेटीएम, स्नॅपडील, डिजिट, गो फ्रुगल, ग्रॅब, डंझो हे प्लॅटफॉर्म ‘ओएनडीसी’ला जोडले गेले आहेत.(लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.)