आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Home » आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या
आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

पुलाव, बिर्याणी आणि चिकनमध्ये दालचिनीचा एक तुकडाही कमाल करुन जातो. दालचिनीची तिखट गोड चव पदार्थांमध्ये उतरल्यानंतर पदार्थ अधिक रुचकर लागतो. दालिचिनी ही मुख्यत: श्रीलंका आणि भारतातील केरळ भागात अधिक पाहायला मिळते. दालचीन हे सदाहरित वृक्षात मोडते. त्याच्या खोडाच्या सालीला दालचिनी असे म्हणतात. याच वृक्षाच्या वाळलेल्या पानांचा वापर तमालपत्र म्हणून केला जाते. हे दोन्ही मसाल्याचे पदार्थ असून याचा वापर फार पूर्वीपासून स्वयंपाकात केला जातो. पण जेवणाव्यतिरिक्तही दालचिनी चे फायदे भरपूर आहेत. तुम्हालाही दालचिनीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर मग हा लेख पूर्ण वाचा.हेही वाचा: आजीचा बटवा: गणपतीच्या पूजेत लागणाऱ्या 21 पत्री वाहण्यामागचे शास्र● आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदेवेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. दालचिनी चे फायदे मराठी आरोग्यजगतात खूप मानले जातात.● दालचिनी खाणे हा पीसीओएसवर चांगला रामबाण उपाय आहे.जर तुम्हाला PCOSची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे. PCOS मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला PCOSमुळे होणारा त्रास कमी होईलRecommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर29 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त30 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.30 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम36 minutes agoहेही वाचा: आजीचा बटवा: खोकल्यावरचा रामबाण उपाय असलेली
सुंठ खाण्याचे काय आहेत फायदे● दालचिनी ह्दय विकार ठेवते नियंत्रणातह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते● दालचिनी पिंपल्सना करते दूरपिंपल्सवर दालचिनी एक उत्तम इलाज आहे. पिंपल्सना कमी करण्याचे काम दालचिनी करते. यासाठीही एक खास फेसपॅक तुम्हाला दालचिनीपासून तयार करायचा आहे. जो तुमच्या पिंपल्सना कमी करेल.हेही वाचा: आजीचा बटवा: पोटाचा घेर कमी करायचा आहे मग आजीच्या बटव्यातला जिऱ्याचा करा उपयोग ● दालचिनी वजन ठेवते नियंत्रणातमहिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते. जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या. 1 कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी 30 मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. (गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील) हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल.● दालचिनी डायबिटीस ठेवते नियंत्रणातशरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. त्यामुळे नित्य सेवनात असावी.हेही वाचा: आजीचा बटवा: रिठ्यांचा वापर करून घरच्या घरी बनवा शाम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क● दालचिनी रंग उजळवते रंग उजवण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये असणारे ब्लिचींग एजंट तुमचा चेहऱ्याचा रंग उजळवतात. तुम्हाला अगदी चिमूटभर दालचिनी आणि त्यात एक चमचा मध किंवा दही घालायचे आहे. हा मास्क तुम्हाला चेहऱ्याला लावायचा आहे. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करते आणि तुमची त्वचा उजळवण्यास मदत करते
डोक्यांच्या विकारावर गुणकारीडोळे कोरडे पडणे, शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतीलत तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे. दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील. ● दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होईल.दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनीपावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण 30 मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.