10,000 रुपयांच्या SIP मधून 5 वर्षांत मिळवा 12 लाख रुपये

Home » 10,000 रुपयांच्या SIP मधून 5 वर्षांत मिळवा 12 लाख रुपये
10,000 रुपयांच्या SIP मधून 5 वर्षांत मिळवा 12 लाख रुपये

मुंबई : म्युचुअल फंडात लाँग टर्मच्या दृष्टीने पैसे गुंतवले तर दमदार परतावा मिळू शकतो. विशेषतः इक्विटी म्यूचुअल फंडचा (Equity Mutual Fund) विचार केल्यास चक्रवाढ व्याज अर्थातच कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा मिळतो. बाजारात अस्थिरता असतानाही  यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा तुम्हाला यात मिळू शकतो.जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले फंड्स असतील तर साहजिकच तुम्हाला चांगला परतावा मिळेल. म्युच्युअल फंड योजना निवडताना रेटिंग हा देखील एक पॅरामीटर आहे. हाय रेटिंग म्हणजे गुंतवणूकदारांना भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आम्ही आज 5 स्टार रेटिंग असलेल्या काही म्युच्युअल फंडांबद्दल बोलत आहोत. या फंडांनी 10,000 रुपयांच्या एसआयपीचे रूपांतर केवळ 5 वर्षांत 12 लाख रुपयांमध्ये केले आहे.या तीन म्युच्युअल फंडांची कमाल कामगिरी1. क्वांट ऍक्टिव्ह फंड (Quant Active Fund)क्वांट ऍक्टिव्ह फंड डायरेक्ट ग्रोथ फंड 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आला. मॉर्निंगस्टारने याला 5 स्टार रेटिंग दिले आहे. 30 जून 2022 पर्यंत फंडाची ऍसेटअंडर मॅनेजमेंट (AUM) 2,644 कोटी आहे. त्याचा बेंचमार्क निफ्टी 500 मल्टीकॅप आहे. त्याची वार्षिक वाढ 21.08% आहे. गेल्या एका वर्षात त्याने 14 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी यामध्ये 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज ही रक्कम 12.72 लाख रुपये झाली असती. या 5 वर्षांत फंडाने वार्षिक 30.62 टक्के परतावा दिला आहे.2. क्वांट मिड कॅप फंड (Quant Mid Cap Fund)क्वांट मिड कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ फंड 1 जानेवारी 2013 रोजी सुरू झाला. 9 सप्टेंबर रोजी त्याची ऍसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 621 कोटी आहे. या फंडाने गेल्या वर्षभरात 23.65 टक्के परतावा दिला आहे. त्याचा वार्षिक सरासरी परतावा 17.46 टक्के आहे. गेल्या 5 वर्षांत 30.97 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.  या  5 वर्षांत 10,000 रुपयांची एसआयपीचे 12.83 लाख रुपये झाली असती.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes ago3. पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड (PGIM India Midcap Fund)पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ 2 डिसेंबर 2013 रोजी सुरू झाला. त्याची ऍसेट अंडर मॅनेजमेंट (AUM)  30 जून 2022 रोजी 6614 कोटी रुपयांची होती. त्याचा बेंचमार्क निफ्टी मिडकॅप 150 आहे. या फंडाने गेल्या 5 वर्षांत 31.40 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. एखाद्याने 5 वर्षांत 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आतापर्यंत त्याचे 12.96 लाख रुपये मिळाले असते.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.