IND vs AUS: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटका

Home » IND vs AUS: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटका
IND vs AUS: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटका

India vs Australia 1st T20: टी-20 वर्ल्ड कप 2022 ची तयारी पाहता टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिकेची सुरुवात खूपच खराब झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात अनुभवी खेळाडूला न घालणे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले आहे. या खेळाडूने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत, परंतु कर्णधार रोहित शर्माने या खेळाडूला पहिल्या टी-20 साठी प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केला नाही.हेही वाचा: Women’s T20 Asia Cup : महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी होणार!ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण खराब गोलंदाजी होते. या सामन्यात कर्णधार रोहितने अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांचा फिरकीपटू म्हणून समावेश केला होता. तर अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला डावलले. आर अश्विन प्रत्येक स्थितीत गोलंदाजी करण्यात माहिर आहे. तरीही त्याला संघात घेतले नाही.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर6 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त7 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.7 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम13 minutes agoहेही वाचा: Video : “अय्, आवाज येत नाही काय?”; रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळाटीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहे. नुकतेच त्याने टीम मध्ये पुनरागमन केले आहे, आता तो या स्पर्धेत संघाचा महत्त्वाचा एक भाग बनला आहे. आर अश्विन आशिया कपमध्येही खेळला आहे. टीम इंडियाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौऱ्यावर आर अश्विनने टी-20 संघात पुनरागमन केले. अश्विनने टीम इंडियासाठी 56 टी-20 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांचा कर्णधार रोहित आर अश्विनला संधी दिल्यास तो संघासाठी मोठा सामना विजेता ठरू शकतो.ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियन संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा करून सामना जिंकला.