Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?

Home » Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?
Share Market : 22 पैशांचा मल्टीबॅगर शेअर, आहे का तुमच्याकडे?

सरकारी मालकीच्या एअरोस्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सने (Bharat Electronics) गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. त्यांनी गुंतवणुकदारांच्या एक लाख रुपयांमधून केवळ एक कोटीच नाही तर 50 हजार टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत 5 कोटी बनवले. तुमचा विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे.1 जानेवारी 1999 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे (Bharat Electronics) शेअर्स केवळ 22 पैशांना मिळत होते, जे आता 16 सप्टेंबर 2022 रोजी बीएसईवर 111.20 रुपये झाले आहेत. एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 5.05 कोटी रुपये झाले असते.Recommended ArticlesNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 3 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प3 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 3 hours agoगुरुवारी विक्रमी उच्चांककंपनीच्या 68 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शेयरहोल्डर्स एक बोनस शेअर आणि 150% डिव्हिडेंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर, भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये बरीच खरेदी झाली आणि मग त्यात नवनवे उच्चांक स्थापित करायला लागला.हेही वाचा: Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंडगुरुवारी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे (Bharat Electronics) शेअर्स 115 रुपयांवर पोहोचले, जी त्याची विक्रमी उच्च पातळी आहे. शुक्रवारी बाजारातील कमजोरीमुळे विक्रीचा दबाव होता आणि त्यात काहीशी घसरण झाली. कंपनीच्या शेयरहोल्डर्सना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 2:1 आणि 150% लाभांशाच्या प्रमाणात बोनस जारी करण्यास मान्यता मिळाली.भारत इलेक्ट्रॉनिक्स ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक पीएसयू आहे जी संरक्षण सेवांच्या आवश्यकतांनुसार विशेष इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करण्यासाठी 1954 मध्ये सुरू करण्यात आली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स सैन्यासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करते. याशिवाय होमलँड सिक्युरिटीज सोल्युशन्स, स्मार्ट सिटीज, ई-गव्हर्नन्स सोल्युशन्स, स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, एनर्जी स्टोरेज प्रॉडक्ट्स, एअरपोर्ट सोल्युशन्स, ईव्हीएम, टेलिकॉम प्रॉडक्ट्स आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इ. सेवा पुरवते.चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही चांगली राहिली नाही आणि तिमाही आधारावर तिच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा निव्वळ नफा एप्रिल-जून 2022 मध्ये तिमाही आधारावर 1141.81 कोटी रुपयांनी घसरून 431.49 कोटी रुपयांवर आला, तर महसूलही याच कालावधीत 6324.90 कोटी रुपयांवरून 3112.78 कोटी रुपयांवर घसरला.हेही वाचा: Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्ननोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.