Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंड

Home » Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंड
Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंड

स्मॉलकॅप फर्म इंटरनॅशनल कन्व्हेयर्स  (International Conveyors Limited – ICL) त्यांच्या भागधारकांना 100% डिव्हिडेंड देणार आहे. यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे. औद्योगिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेल्या या स्मॉलकॅप कंपनीची मार्केट कॅप 425 कोटी रुपये आहे. 1978 मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेयर्स लिमिटेड (ICL) विणलेल्या फॅब्रिकपासून बनवलेले पीवीसी इंप्रेगनेटेड आणि पीवीसी कोटेड फायर रिटार्डंट, अँटी स्टॅटिक कन्वेयर बेल्टिंगचे उत्पादन आणि विक्री करते. आयसीएल सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची PVC सॉलिड बेल्टिंग उत्पादक आहे आणि तिच्या उत्पादनाचे 90 टक्के निर्यात करते.किती डिव्हिडेंड देणार ?कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्सवर प्रति शेअर 1 रुपये म्हणजेच 100% डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यासाठी येत्या एजीएममध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे. कंपनीचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक शनिवार, 24 सप्टेंबर 2022 रोजी बंद राहील. यासाठीच कंपनीची 49 वी एजीएम 30 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. डिव्हिडेंडची रेकॉर्ड तारीख शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoहेही वाचा: Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, ‘या’ शेअरचा छप्परफाड रिटर्न10 वर्षात 308% परतावाइंटरनॅशनल कन्व्हेयर्स लिमिटेडचे (International Conveyors Limited – ICL) शेअर्स एका दिवसापूर्वी म्हणजे 15 सप्टेंबर 2022 रोजी थोड्या घसरणीसह 63.25 रुपयांवर बंद झाले. पण, या शेअरने गेल्या 10 वर्षात 308.09 टक्के आणि गेल्या पाच वर्षात 162.71 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने 111.58 टक्के परतावा दिला आहे, पण गेल्या वर्षात हे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरले आहे. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे.हेही वाचा: Share Market : तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स देतील बंपर रिटर्नजून 2022 अखेर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग 66.33 टक्के होती, जी थर्मॅक्स, जीएमएम फॉडलर, प्राझ इंडस्ट्रीज आणि बीईएमएल या स्पर्धकांपेक्षा जास्त आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.