IND vs AUS 1st T2O : वेडची झुंंजार खेळी; भारताचा तोंडचा घास पळवला

Home » IND vs AUS 1st T2O : वेडची झुंंजार खेळी; भारताचा तोंडचा घास पळवला
IND vs AUS 1st T2O : वेडची झुंंजार खेळी; भारताचा तोंडचा घास पळवला

India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने भारताचे 209 धावांचे आव्हान 19.2 षटकातच पार करत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामना 4 विकेट्स राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक 61 धावा केल्या तर पडझडीनंतर मॅथ्यू वेडने डाव सावरत 21 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने 3 तर उमेश यादवने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.India vs Australia 1st T20I Highlights Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.1 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoमॅथ्यू वेडने सामना आणला जवळ ऑस्ट्रेलियाच्या 12 ते 17 षटकात पाठोपाठ विकेट्स पडल्याने ते बॅकफूटला गेले होते. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिडने आक्रमक फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. 145-5 : अक्षर पटेलने कांगारूंना दिला अजून एक धक्काअक्षर पटेलने 10 चेंडूत 17 धावा करणाऱ्या जॉश इग्निसचा त्रिफळा उडवत कांगारूंना पाचवा धक्का दिला. 123-4 : रोहितचा रिव्ह्यू अन् सेट झालेला स्मिथ झाला बादभारताचा कर्णधार रोहित शर्माने स्मार्ट रिव्ह्यू घेतला त्यामुळे स्टीव्ह स्मिथची 35 धावांची खेळी समाप्त झाली. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर देखील रोहितने ग्लेन मॅक्सवेलसाठी रिव्ह्यू घेतला. तोही परफेक्ट राहिला. त्यामुळे उमेश यादवला एकाच षटकात स्मिथ आणि मॅक्सवेल दोन्ही विकेट मिळाल्या. 109-2 : अखेर अक्षरनेच दिला दिलासाकॅमेरून ग्रीनचा झेल सोडणाऱ्या अक्षर पटेलनेच त्याला बाद केले. मात्र तोपर्यंत ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा चोपल्या होत्या. सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या ग्रीनने चांगलेच चोपले भारताने ठेवलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनला सलामीला पाठवत कांगारूंनी आपले इरादे आधीच स्पष्ट केले. त्याने उमेश यादवच्या दुसऱ्याच षटकात सलग 4 चौकार मारत धडाक्यात सुरूवात केली. त्याने जीवनदानाचा फायदा उचलत 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 10 व्या षटकातच शतक पार केले.39-1 : अखेर अक्षर आला धावून ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी अॅरोन फिंच आणि कॅमेरून ग्रीन यांनी 3 षटकात 38 धावा चोपून चांगली सुरूवात केली होती. मात्र अखेरीस अक्षर पटेलने फिंचचा 22 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दिलासा दिला. 208-6 (20 Ov) : हार्दिक पांड्याने 25 चेंडूत ठोकले अर्धशतकहार्दिक पांड्याने 25 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याने शेवटच्या षटकात कॅमेरून ग्रीनला सलग तीन षटकार मारत भारताला 208 पर्यंत पोहचवले.176-6 : दिनेश कार्तिक स्वस्तात माघारीएलिसने दिनेश कार्तिकला 6 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. एलिसची ही तिसरी विकेट होती.146-5 : भारताचा निम्मा संघ माघारी दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अक्षर पटेलने निराशा केली. तो 5 चेंडूत 6 धावा करत एलिसची शिकार झाला.126-4 : सूर्याचा चांगल्या सुरूवातीनंतर झाला अस्तसूर्यकुमार यादवने राहुल बाद झाल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र त्याने 25 चेंडूत 46 धावा चोपल्या असताना कॅमेरून ग्रीनने त्याला बाद केले. 103-3 : अर्धशतकानंतर राहुल बाद जॉस हेजलवूडने भारताचा दुसरा सलामीवीर देखील गळाला लावला. त्याने केएल राहुलला 55 धावांवर बाद करत तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 68 धावांची भागीदारी तोडली. IND 86/2 (10)  : केएल राहुलने गिअर बदललाकेएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. राहुल 47 धावांवर नाबाद आहे तर सूर्याने 16 चेंडूत 23 धावा केल्या आहेत. 50-2 (6.3 Ov) : भारताचे अर्धशतक कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी गेल्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत सातव्या षटकात भारताचे अर्धशतक धावफलकावर लागवले.35-2 : विराट कोहली स्वस्तात माघारीविराट कोहली 7 चेंडूत 2 धावा करून माघारी परतला. त्याला नॅथन एलिसने बाद केले. हेजलवूडने दिला भारताला पहिला धक्काजॉश हेजलवूडने भारताला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले.जसप्रीत बुमराह खेळणार नाही, ऋषभ पंत बेंचवरटी 20 वर्ल्डकप संघात पुनरागमन केलेला जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. बुमराह नुकताच दुखापतीतून सावरला आहे. रोहितने तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल असे सांगितले.याचबरोबर भारताने पहिल्या सामन्यासाठी विकेटकिपर म्हणून दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे. डावखुरा फलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी देऊन संघात उत्तम समतोल साधण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.ऑस्ट्रे्लियाने  नाणेफेक जिंकलीऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरचा टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून टी 20 पदार्पण करणार आहे. थोड्याच वेळात सुरू होणार वर्ल्डकपची रंगीत तालीमभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात मोहालीत सुरूवात होत आहे.