Mohammad Rizwan : बाबर पाठोपाठ रिझवाननेही विराटला टाकलं मागे

Home » Mohammad Rizwan : बाबर पाठोपाठ रिझवाननेही विराटला टाकलं मागे
Mohammad Rizwan : बाबर पाठोपाठ रिझवाननेही विराटला टाकलं मागे

Mohammad Rizwan Pakistan Vs England 1st T20 : मोहालीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 सामना सुरू असतानाच तिकडे सीमेपार कराचीत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात देखील टी 20 सामना रंगला आहे. तिकडेही इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी 85 धावांची सलामी दिली. दरम्यान, पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने एक माईल स्टोन पार केला. हा माईल स्टोन पार करताना त्याने भारतीची रन मशिन विराट कोहलीला मागे टाकले. यापूर्वी बाबर आझमने देखील विराट कोहीलाला मागे टाकले होते. हेही वाचा: Jasprit Bumrah Wife : IND vs PAK सामन्यानंतर बुमराहच्या बायकोची झाली भांडणनाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने दमदार सुरूवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान 9.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. दरम्यान, मोहम्मद रिझवानने आपल्या टी 20 मधील 2000 धावा पूर्ण केल्या. रिझवानने फक्त टी 20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करण्याचा माईल स्टोन गाठला नाही तर त्याने विक्रमही केला. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो बाबर आझमसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने 52 डावात ही कामगिरी केली. बाबर आझमने देखील 52 डावत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.याच यादीत भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 56 टी 20 डावात 2000 धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचाच केएल राहुल आहे. त्याने 58 डावात टी 20 मध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचने 2000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी 62 डाव घेतले होते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर5 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त6 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.6 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम12 minutes agoहेही वाचा: Virat Kohli : विराट सचिनचं ‘शतकी’ रेकॉर्ड मोडणार? रिकी पॉटिंग म्हणतो… पाकिस्तानने इंग्लंडविरूद्ध धडाकेबाज सुरूवात केली तरी बाबर आझम (31) आणि मोहम्मद रिझवान (68) बाद झाल्यानतंर पाकिस्तानचा डाव ढेपाळला. त्यांना 20 षटकात 7 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून लुक वूडने 3 तर आदिल राशिदने 2 विकेट घेतल्या.