कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’

Home » कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’
कोरोना साथीमुळे माणूस पाच वर्षे मागे; ‘यूएनडीपी’

न्यूयॉर्क : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंच्या साथीमुळे सर्वच देशांचा विकास मार्गच खुंटला. यातून जग हळूहळू सावरत आहे. पण कोरोनासह सतत उद्‍भवलेल्या अन्य मोठ्या संकटांमुळे माणूस पाच वर्षे मागे गेला असून अनिश्‍चिततेची जागतिक लाटच त्यामुळे आली आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा (यूएनडीपी)च्या अहवालात व्यक्त केले.‘यूएनडीपी’ने स्थापनेपासून ३० वर्षे मानवी विकास निर्देशांक जाहीर केला जातो. या निर्देशांकात प्रथमच असे मत व्यक्त करण्यात आले आहे. कोरोनासारख्या संकटांमुळे देशांचे आयुर्मान, शैक्षणिक पातळी आणि राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. हे २०२० व २०२१ या दोन वर्षांत याचे प्रमाण सर्वाधिक होते, असे ‘अनसर्टन टाइम्स, अनसेटल्ड लाइव्हज’ या शीर्षकाच्या अहवालात नमूद केले आहे.‘‘याचा अर्थ आपला मृत्यू लवकर होणार आहे. आपले शिक्षण कमी असेल आणि आपले उत्पन्न कमी होत चालले आहे,’’ अशी प्रतिक्रिया ‘यूएनडीपी’चे प्रमुख एचिम स्टॅनर यांनी दिली. ‘एएफपी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की अनेक लोक हताश, निराश का झाले आहेत?, भविष्याबद्दल चिंता का वाटू लागली आहे, याबद्दल केवळ तीन मापदंडाद्वारे आपल्याला समजू शकेल.जागतिक अनेक दशकांपासून मानवी विकास निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे, पण २०२० पासून त्यात घसरण होण्यास सुरुवात झाली. २०२१मध्येही निर्देशांक उतरतात राहिला. यामुळे मागील पाच वर्षांत आपण जे कमावले होते, ते गमावण्याची वेळ आली. जगाचा प्रवास उलट दिशेने होण्यामागे कोरोनाची साथ हे एक मुख्य कारण आहे. पण त्याचबरोबर राजकीय, आर्थिक आणि हवामानविषयक समस्यांमुळेही लोकांना सावरण्यास वेळ मिळाला नाही, असेही अहवालात म्हटले आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes agoअहवालातील निरीक्षणेकोरोनासाथीतून बाहेर येऊन विकासाच्या दिशेने काही देशांचे मार्गक्रमणयशस्वी देशांमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड यांचा समावेश आहेदक्षिण सुदान, चाड व नायजेर हे देश तळात आहेतरशिया-युक्रेन युद्धामुळे लॅटिन अमेरिका, आफ्रिकी, दक्षिण आशियाई व कॅरेबियन मधील अनेक देशांपुढे गंभीर संकटसकारात्मक मुद्देतीन मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सुधारणा केल्या होऊ शकतातअपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक, भविष्यातील साथींसाठी तयारी, विम्याचा विचार आणि भविष्यातील संकटांना पूर्ण क्षमतेने सामोरे जाण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधणेरशियाने युक्रेनवर केलेल्या अतिक्रमणामुळे जगात निर्माण झालेल्या खाद्य व ऊर्जा संकटावर या अहवालात प्रकाश टाकलेला नाही. पण २०२२ हे वर्षही संकटमय आहे, यात कोणतीही शंका नाही.’’- एचिम स्टॅनर, प्रमुख, ‘यूएनडीपी’