Virat Kohli : विराट सचिनचं ‘शतकी’ रेकॉर्ड मोडणार? रिकी पॉटिंग म्हणतो…

Home » Virat Kohli : विराट सचिनचं ‘शतकी’ रेकॉर्ड मोडणार? रिकी पॉटिंग म्हणतो…
Virat Kohli : विराट सचिनचं ‘शतकी’ रेकॉर्ड मोडणार? रिकी पॉटिंग म्हणतो…

Ricky Ponting Statement Over Virat Kohli : भारताचा रन मशिन विराट कोहलीने जवळपास तीन वर्ष रखडलेले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक आशिया कपमध्ये झळकावले. त्याने अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 सामन्यात नाबाद 122 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपले मत व्यक्त केले. याचबरोबर विराट कोहली सचिन तेंडुलरच्या शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडणार का यावर देखील पॉटिंग बोलला आहे. हेही वाचा: IND vs AUS 1st T2O Live : अर्धशतकानंतर राहुल बाद; हेजलवूडने केली दुसरी शिकारविराट कोहली सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडणार का असा प्रश्न रिकी पॉटिंगला विचारण्यात आला. त्यावर पॉटिंगने म्हणाला की, ‘तुम्ही हा प्रश्न तर तीन वर्षापूर्वी विचारला असता तर मी खात्रीने हो म्हणालो असतो. मात्र खरं सांगायचं झालं तर त्याचा वेग आता मंदावला आहे.’पॉटिंग पुढे म्हणाला की, ‘मात्र मला अजूनही असे वाटते की त्याच्याकडे अजून काही वर्षे आहेत. अजूनही त्याला 30 आंतरराष्ट्रीय शतके ठोकायची आहेत. हा आकडा खूप आहे. यासाठी त्याला पुढच्या तीन ते चार वर्षात वर्षाला पाच ते सहा कसोटी शतके ठोकावी लागतील. त्याच्या जोडीला दोन चार वनडे शतके आणि एखदं टी 20 शतक ठोकावं लागेल.’Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर5 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त6 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.6 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम12 minutes agoहेही वाचा: Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?शेवटी पॉटिंग म्हणाला की, ‘मी विराट करू शकणार नाही असं म्हणणार नाही. जर विराट कोहली एकदा का त्या झोनमध्ये आला तर तो धावांसाठी किती भुकेला असतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी विराट करूच शकणार नाही असं म्हणणार नाही.’