Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?

Home » Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?
Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?

Jasprit Bumrah India Vs Australian 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा मोहालीत खेळवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी असलेल्या मोहालीत भारताची ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणारी अंतिम प्लेईंग 11 या सामन्यात उतरेल असे वाटले होते. मात्र ज्यावेळी संघाची घोषणा झाली त्यावेळी चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळणार नाहीये. यामुळे जसप्रीत बुमराह अजून फिट झाला आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. हेही वाचा: IND vs AUS 1st T2O Live : भारताला पहिला धक्का, हेजलवूडने केली कर्णधार रोहितची शिकारदरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. यावेळी संघात जसप्रीत बुमराहचे नाव नाही हे ऐकताच चाहत्यांच्या भारतीय संघाच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रोहितने जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यासाठी का खेळणार नाही याचे कारण सांगितले. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर5 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त6 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.6 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम12 minutes agoहेही वाचा: Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेतरोहित शर्मा म्हणाला की, ‘जसप्रीत बुमराह गेम ब्रेक घेणार आहे. तो शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल.’ रोहितच्या या उत्तरावर बुमराह अजून फिट झाला आहे की नाही याबाबतची शंका जास्तच बळावली. कारण पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेला बुमराह बऱ्याच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. तो जर दुखापतीतून सावरला असेल तर त्याच्यासाठी वर्ल्डकपपूर्वी जास्तीजास्त सामने खेळणे गरजेचे आहे. या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या प्रत्येकी 3 टी 20 सामन्यांची मालिका एक चांगली संधी आहे.जसप्रीत बुमराह बरोबरच ऋषभ पंतला देखील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात संधी मिळालेली नाही. त्याच्या ऐवजी डावखुरा फलंदाज म्हणून अक्षर पटेलची चाचपणी करण्यात येत आहे.