Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेत

Home » Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेत
Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेत

Ravi Bishnoi T20 World Cup India Squad : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. या संघात अनेक दर्जेदार खेळाडूंना जागा मिळवता आली नाही. भारताच्या अनेक खेळाडूंना गेल्या काही टी 20 मालिकांमध्ये आजमावून पाहण्यात आले. त्यातील काहींनी चांगली कामगिरी करून देखील त्यांना संघात स्थान मिळाले नाही. भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोई देखील यात श्रेणीत मोडतो. दरम्यान, मोहम्मद शमी, दीपक चाहर, श्रेसय अय्यर आणि रवी बिश्नोई यांनी टी 20 वर्ल्डकप संघासाठी स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आले आहे. हेही वाचा: Smriti Mandhana :स्मृतीची ICC Rankings मध्ये मुसंडी; T20 मध्ये कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरीरवी बिश्नोईने आशिया कपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याने ‘सूर्य पुन्हा उगवेल आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू’ अशी सकारात्मक वृत्ती दर्शवणारी स्टोरी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली. टी 20 वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल हे दोन प्रमुख फिरकीपटू असतील. त्यांच्या जोडीला अष्टपैलू म्हणून डावखुरा अक्षर पटेल देखील संघात असणार आहे.Recommended ArticlesNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 4 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प4 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 4 hours agoदरम्यान, आशिया कपमधील बहुतांश संघ हा टी 20 वर्ल्डकपसाठी देखील तसाच ठेवण्यात आला आहे. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोन वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर संघात परतले आहेत. त्यांनी रवी बिश्नोई आणि आवेश खान यांची जागा घेतली. रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. त्याचा सलामीवीर पार्टनर केएल राहुल उपकर्णधार असेल.हेही वाचा: Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला…भारताचा ICC T20 World Cup 2022 साठीचा संघ :रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.स्टँड बाय : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर