Smriti Mandhana :स्मृतीची ICC Rankings मध्ये मुसंडी; T20 मध्ये कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी

Home » Smriti Mandhana :स्मृतीची ICC Rankings मध्ये मुसंडी; T20 मध्ये कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी
Smriti Mandhana :स्मृतीची ICC Rankings मध्ये मुसंडी; T20 मध्ये कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी

ICC Women’s Players Smriti Mandhana : भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने आज जाहीर झालेल्या आयसीसी महिला खेळाडू रँकिंगमध्ये धमाल केली. स्मृतीने टी 20 मध्ये कारकिर्दित पहिल्यांदाच रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर स्मृती वनडे रँकिंगमध्ये देखील तीन स्थानांनी वर सरकली आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात स्मृती मानधना दमदार फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यात तिने एकूण 111 धाा केल्या आहेत. या कामगिरीचा फायदा तिला आयसीसी रँकिंगमध्ये झाला. हेही वाचा: Babar Azam : पाकिस्तानी पत्रकारावर संतापला कर्णधार बाबर आझम, म्हणाला…स्मृती मानधना यापूर्वी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली होती. तिने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 91 धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीमुळे ती आता सातव्या स्थानावर पोहचली आहे. याचबरोबर टी 20 मध्ये स्मृतीचा पार्टनर सलामीवीर शेफाली वर्मा देखील टॉप टेनमध्ये सामील आहे. ती 666 गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. वनडे रँकिंगमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील चार स्थानांची सुधारणा करत टॉप टेनमध्ये दाखल झाली आहे. ती सध्या 662 गुण घेऊन 9 व्या स्थानावर पोहचली आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर5 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त6 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.6 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम12 minutes agoहेही वाचा: ICC Rules Changes : टी20 वर्ल्ड कप आधी क्रिकेटचे ‘हे’ नियम बदलणार, ICC चा मोठा निर्णयटी 20 अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये भारताची दिप्ती शर्मा देखील एक स्थान वर सरकली असून आता ती सहाव्या स्थानावर आहे. टी 20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर 14 व्या तर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह 10 व्या स्थानावर पोहचल्या आहेत. तर फिरकीपटू राधा यादव देखील चार स्थानांवर वर सरकत 14 व्या स्थानावर पोहचली आहे.