किंग चार्ल्स हे रोमान्ससाठी देखील आहेत फेमस, अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची झालीय चर्चा

Home » किंग चार्ल्स हे रोमान्ससाठी देखील आहेत फेमस, अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची झालीय चर्चा
किंग चार्ल्स हे रोमान्ससाठी देखील आहेत फेमस, अनेक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची झालीय चर्चा

चार्ल्स यांनी गुरुवारी रात्री त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ग्रेट ब्रिटनचा राजा म्हणून पदभार स्वीकारला.यानंतर लगेच त्यांचे अफेअर चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी कॅमिला, जी आता क्वीन कॉन्सोर्ट आहे आणि राजकुमारी डायना यांच्याशी त्याचे संबंध चर्चेचा विषय आहेत. चार्ल्स तरुण असताना त्यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी करणाऱ्या लॉर्ड माउंटबॅटनने त्यांना शक्य तितके अफेअर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांना चार्लीज एंजल्स हे टोपणनावही दिले. रॉयल तज्ञांचा अंदाज आहे की प्रिन्स चार्ल्सचे 1967 ते 1980 दरम्यान 20 पेक्षा जास्त संबंध होते.चला तर मग आता आपण राजा चार्ल्सच्या अफेअरची घडामोडींवर एक नजर टाकु या..● किंग चार्ल्सचे पहिले प्रेम कोणतं होत?एका रिपोर्टनुसार, किंग चार्ल्सचे पहिले प्रेम हे लुसिया सांताक्रूझ नावाची महिलेवर होत. लुसिया या चिलीच्या तत्कालीन राजदूताच्या कन्या होत्या. या दोघांची भेट 1969 ला एका डिनर पार्टीमध्ये झाली होती ते पहिल्या नजरेत प्रेमात पडले होते.चार्ल्सची चुलत बहीण आणि लुसियाची मैत्रिण लेडी एलिझाबेथ अँसन म्हणाली, “ती त्याच्या आयुष्यातील पहिले खरे प्रेम होते.”● पार्कर बॉल्स स्ट्रेचरकिंग चार्ल्स आणि कॅमिला यांची पहिली भेट ही 1970 मध्ये पोलो इथे सुरू असलेल्या एका क्रिकेट सामन्या दरम्यान झाली होती. तिथून पुढे मग ते दोघे एकमेकांना काही काळापर्यंत डेट करत होते. पण त्यांच्या नशिबात मात्र काहीतरी वेगळेच लिहून ठेवलेलं होते. आणि पुढे अचानक कॅमिलाने 1973 मध्ये अँड्र्यू पार्कर बाउल्सशी लग्न केले.आणि मग नंतर चार्ल्सने देखील 1981 मध्ये प्रिन्सेस डायनाशी लग्न केले. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतरही दोघांचे नाते कायम होते. पुढे 1993 मध्ये चार्ल्स आणि कॅमिला यांच्यातील फोन कॉल लीक झाला होता. आणि मग चार्ल्स आणि कॅमिला यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि 1997 मध्ये राजकुमारी डायनाच्या मृत्यूनंतर 2005 मध्ये लग्न केले.Recommended Articlesभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 3 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ3 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही3 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य3 hours agoहेही वाचा: Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्यानंतर कोहीनुर हिऱ्याचे काय होणार ?● राजकुमारी डायनाडायना आणि चार्ल्स यांची पहिली भेट 1977 मध्ये डायनाची मोठी बहीण सारा हिच्याद्वारे झाली होती.लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हत्येनंतर एक वर्षानंतर 1980 मध्ये त्यांची भेट झाली.या जोडप्याने फेब्रुवारी 1981 मध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली. पाच महिन्यांनंतर त्यांनी सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये एका भव्य समारंभात लग्न केले.पुढे 1992 मध्ये, शाही जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा केली आणि घटस्फोट घेतला.चार्ल्सच्या विवाहबाह्य संबंधांचीही बरीच चर्चा झाली.यामुळे त्याचे राजकुमारी डायनासोबत ब्रेकअप झाले. 1995 च्या एका मुलाखतीत, राजकुमारी डायनाने चार्ल्सच्या कॅमिला पार्कर बाउल्ससोबतच्या अफेअरचा उल्लेख केला आणि म्हटले की “त्याच्या लग्नात तीन लोक होते”.
● सारा स्पेन्सरसारा आणि चार्ल्स, राजकुमारी डायनाची मोठी बहीण आणि 8 व्या अर्ल स्पेन्सरची मुलगी, 1977 मध्ये प्रथम भेटले.1977 मध्ये हे जोडपे थोड्या काळासाठी प्रेमात पडले, परंतु चार्ल्सने पत्रकारासोबत बोलतांना सांगितले की मला सारा स्पेन्सरसोबत लग्न करण्यात रस नाही. चार्ल्सने सांगितल्यानंतर ते वेगळे झाले. पुढे सारा स्पेन्सर 1978 मध्ये, स्पेन्सरने टाईम मासिकाला सांगितले, “माझा त्याच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही.मी त्यांच्या प्रेमात वेडी नाही आहे. मी ज्याच्यावर प्रेमच करत नाही अशा माणसांसोबत मी कधीही लग्न करणार नाही.मग तो सामान्य माणूस असो किंवा इंग्लंडचा राजा असो.”हेही वाचा: Elizabeth : महाराणी एलिझाबेथ यांचे हे फोटो पाहिलेत का ?● अन्ना वॉलेसअन्ना वॉलेस, स्कॉटिश जमीन मालक हमिश वॉलेसची मुलगी, 1980 मध्ये चार्ल्सला भेटली. आणि चार्ल्सने अण्णाला डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर चार्ल्सने दोनदा लग्नचा प्रस्ताव मांडला, पण अण्णांनी दोन्ही वेळा नकार दिला. लेखिका जेसिका जेने यांच्या म्हणण्यानुसार, अण्णांनी त्यांच्या आईच्या 80 व्या वाढदिवसाच्या पार्टीत हे प्रकरण संपवले.चार्ल्सने संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.तथापि, दुसऱ्या एका लेखकाचा असा विश्वास आहे की राजकुमारच्या कॅमिलाशी असलेल्या संबंधांमुळे दोघे वेगळे झाले.